Post Office Fixed Deposit Rules Changed Know About Fd Premature Withdrawal Rules Here Know All Details Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Post Office Fixed Deposit Rules: सर्वात सुरक्षीत आणि आकर्षक परतावा देणाऱ्या योजनामुळे अनेक गुंतवणूकदार (Investors) पोस्ट ऑफिसच्या योजनांना (Post Office Schemes) पसंती देतात. पोस्टाच्या लोकप्रिय योजनांपैकी एक योजना म्हणजे, पोस्ट ऑफिस एफडी योजना (Post Office FD Scheme) किंवा टाईम डिपॉझिट स्किम (Time Deposit Scheme). अलीकडेच अर्थ मंत्रालयानं (Ministry of Economy) पोस्ट ऑफिसच्या (Post Office) एफडी योजनेत मोठे बदल केले आहेत. यासाठी मंत्रालयानं 7 नोव्हेंबर 2023 रोजी अधिसूचनाही जारी केली आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीममध्ये प्री-मॅच्युअर पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट किंवा एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्ही या योजनेच्या बदललेल्या नियमांची माहिती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 

पोस्ट ऑफिस एफडी स्किमच्या प्री-मॅच्युअर पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल

अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 10 नोव्हेंबर 2023 नंतर, पाच वर्षांच्या एफडी योजनेत चार वर्षांच्या कालावधीपूर्वी प्रीमॅच्युअरकेलं जाऊ शकत नाही. म्हणजेच, 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडीतून मुदतपूर्व पैसे काढणं आता फक्त 4 वर्षांनंतर शक्य असणार आहे. याशिवाय तुम्ही एक वर्ष, दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या FD योजनेत गुंतवणूक केल्यास, गुंतवणुकीच्या 6 महिने ते 1 वर्षांच्या आत पैसे काढले तर तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याजदराचाच लाभ मिळेल. जे FD स्कीमपेक्षा खूपच कमी असेल. 

जर तुम्ही दोन आणि तीन वर्षांच्या FD योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 1 वर्षानंतर पैसे काढले तर तुम्हाला FD च्या निश्चित व्याजदरापेक्षा 2 टक्के कमी व्याजाचा लाभ मिळेल. जर तुम्ही पाच वर्षांची FD योजना निवडली तर तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यानुसार, चार वर्षांनंतर आणि पाच वर्षांपूर्वीच्या कालावधीतील व्याजदराचा लाभ मिळेल.

पोस्ट ऑफिसचे जुने विड्रॉल रूल्स काय?

महत्त्वाची बाब म्हणजे, नियमांनुसार, 10 नोव्हेंबर 2023 पूर्वी उघडलेल्या पोस्ट ऑफिस एफडी खात्यांवर जुनेच नियम (विड्रॉल रूल्स) लागू होतील. 9 नोव्हेंबरपर्यंत उघडलेल्या तुमच्या पोस्ट ऑफिस एफडी खात्यात सहा महिने पैसे काढण्याची सुविधा नाही. अशा परिस्थितीत, जुन्या नियमांनुसार, गुंतवणुकीच्या सहा महिन्यांत पैसे काढण्याचीही सुविधा नाही.

तर सहा महिन्यांनंतर, एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष किंवा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधी, जर तुम्ही मुदतपूर्व पैसे काढले, तर तुम्हाला बचत खात्याच्या महिन्यानुसार फक्त व्याजदराचा लाभ मिळेल. ठेव जर तुम्ही पाच वर्षांच्या एफडी योजनेत चार वर्षांनी प्री-मॅच्युअर पैसे काढले तर अशा परिस्थितीत तुम्हाला तीन वर्षांच्या एफडी योजनेचाच लाभ मिळेल.

[ad_2]

Related posts