Congress MLA Ravindra Dhangekar Arrived In Vidhan Bhavan Doctor Dresse Stethoscope In Hand Apron On Body Maharashtra Assembly Winter Session 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत असून, पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे स्टेथोस्कोप आणि एप्रन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात पोहचले आहेत. ललित पाटील प्रकरणात (Lalit Patil Drug Case) सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवन गाठत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर, ललित पाटील यांना पंचतारांकित सेवा रोहित पाटील यांना दिली होती, संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांना अटक करावी यासाठी रस्त्यावर आम्ही आलो असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय संजीव ठाकूर यांना ज्यांनी-ज्यांनी फोन केले, कोण कोण यामध्ये होते त्या  सगळ्यांची चौकशी व्हावी या मागणीचं लक्ष वेधण्यासाठी मी आज अधिवेशनात अशाप्रकारे आलो असल्याचं धंगेकर यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं. 

पुढे बोलतांना ते म्हणाले की, ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला. ससून रुग्णालयाच्या ‘डीन’ने तब्बल नऊ महिने ललित पाटील याला पंचकारित सेवा दिली होती. यासाठी सातत्याने आम्ही आवाज उठवत आहोत. याप्रकरणी आतापर्यंत अनेक लोकांना अटक देखील झाली आहे. मात्र संजीव ठाकूर यांना आत्तापर्यंत अटक झालेली नाही. या मागणीसाठी आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरलो. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. या प्रकरणात सरकारचं लक्ष गेलं पाहिजे आणि संजीव ठाकूर यांना ज्याज्या मंत्र्यांनी फोन केले त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे, असे धंगेकर म्हणाले. 

पोलिसांना फोन करणाऱ्यांवर कारवाई करा…

तर, अनेकांची चौकशी सुरू आहे. आत्तापर्यंत 30 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. पण संजीव ठाकूर यांना देखील अटक केली पाहिजे. तसेच त्यांना ज्यांनी-ज्यांनी फोन केले आणि ललित पाटील याला ससून रुग्णालयात ठेवण्यासाठी मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. तुरुंगात असताना डॉक्टरांना ज्यांनी फोन केले, तसेच ललित पाटीलला अटक केल्यानंतर पोलिसांना ज्यांनी फोन केले त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. 

हातात स्टेथोस्कोपचा, अंगावर एप्रन…

रवींद्र धंगेकर हे स्टेथोस्कोप आणि एप्रन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात पोहचल्यावर त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच, त्यांच्या एप्रनवर “ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे” असे लिहण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ललित पाटील प्रकरणात आक्रमक होणारे ललित पाटील आता अधिवेशनात देखील आक्रमक भूमिका घेतांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या: 

ललित पाटील प्रकरणातील मोठी बातमी; ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक

[ad_2]

Related posts