Nawab Malik Present In Anil Patil Office Maharashtra News Maharashtra Politics Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Nawab Malik : नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात दाखल ABP Majha

नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Assembly Session)  नवाब मलिक (Nawab Malik) आज हजेरी लावणार आहेत.मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. अधिवेशनात मलिक हे अजित पवार गटाच्या आमदारांसोबत बसतात, की शरद पवार गटाच्या आमदारांसोबत ते पाहावं लागेल.  आपण तटस्थ आहोत अशी भूमिका मलिक यांनी आतापर्यंत घेतली होती.  नवाब मलिक आज विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहे. कामकाजात सहभागी होताना नवाब मलिक नेमके कोणत्या गटासोबत बसणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

नवाब मलिक यांच्याकडून अद्याप तरी तटस्थ म्हणू भुमिका जाहीर करण्यात आली आहे. एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांची वेगवेगळी बसण्याची व्यवस्था होणार नाही. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत गट म्हणून अद्याप दोन्ही नेत्यांना मान्यता नसल्याने सर्व आमदार एकत्रीत बसण्याची शक्यता आहे. सभागृहात त्यामुळं आमदारांची नेमकी भूमिका काय हे पाहणे महत्त्वाचे आहे. पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीने चतुराईने हा प्रश्न सोडावला होता. 

[ad_2]

Related posts