Disha Salian Death Case Who Is Disha Salian What Exactly Connection With Aditya Thackeray SIT Inquiry By Maharashtra Government Uddhav Thackeray Narayan Rane BJP Maharashtra Politics Abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Disha Salian Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियानचं मृत्यू प्रकरण (Disha Salian Death Case) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चेत आहे. संपूर्ण राज्याचं राजकारण या प्रकरणानं ढवळून निघालं आहे. पण आता हे प्रकरण चर्चेत आलं आहे ते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव आणि ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या SIT चौकशीमुळे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार असून सरकार आदित्य ठाकरेंची SIT चौकशी करणार आहे. 

दिशा सालियान मृत्यू प्रकरणानं राज्याच्या राजाकारणात गेल्या अनेक दिवसांपासून गोंधळ उडाला आहे. भाजप आमदारांकडून सातत्यानं याप्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. अशातच शिवसेनेतील अंतर्गत फुटीनंतर पक्ष दोन गटांत विभागला गेला आणि ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व निकटवर्तीयांनी आदित्य ठाकरेंना दिशा सालियान प्रकरणावरुन घेरण्यास सुरुवात केली. अशातच आता याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार आहे. 

SIT ची घोषणा ते आदित्य ठाकरेंची चौकशी, आतापर्यंत काय-काय घडलं? 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी साधारणतः वर्षभरापूर्वी दिशा सालियानच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिलेले. दुसरीकडे, दिशाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या पुन्हा चौकशीला विरोध केला होता. कुटुंबीयांचं म्हणणं होतं की, दिशाच्या मृत्यूची आधीच कसून चौकशी करण्यात आली आहे. आता पुन्हा SIT, आमची मुलगी परत येणार आहे का? असा सवाल उपस्थित करत दिशाच्या कुटुंबीयांनी एसआयटी चौकशीसाठी विरोध दर्शवला होता. तसेच, सीबीआयनंही तपासाअंती दिशाचा मृत्यू इमारतीच्या बाल्कनीतून पडून झाल्याचं म्हटलं होतं. तसेच, याप्रकरणात कोणताही राजकीय अँगल नसल्याचंही सीबीआयनं तपासाअंती स्पष्ट केलं होतं. परंतु, भाजप आमदारांकडून सातत्यानं याप्रकरणी पुन्हा तपास करण्याची मागणी केली जात होती. तसेच, आदित्य ठाकरे दिशाच्या मृत्यूच्या वेळी कुठे होते? असा प्रश्नही सातत्यानं भाजप आमदारांनी उपस्थित केला होता. अशातच आता याप्रकरणी एसआयटी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार आहे. 

दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियानचं प्रकरण पुन्हा चर्चेत का आलं? कोण होती दिशा सालियान? तिचा मृत्यू नेमका कधी आणि कसा झाला? दिशाच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत काय-काय घडलं? या प्रकरणावरून आदित्य ठाकरे भाजप नेत्यांच्या निशाण्यावर का आणि कसे आले? जाणून घेऊयात सविस्तर… 

दिशा सालियान कोण? 

दिशा सालियान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर होती. 8 जून 2020 ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशा सालियानचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी दिशानं आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती. वर्कलोड जास्त असल्याचं तिनं आपल्या मैत्रिणीला सांगितलं होतं. त्यानंतर थोड्याचवेळात तिचा होणारा नवरा रोहन यानं दिशा ज्या खोलीत राहात होती, त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्यानं खिडकीतून खाली पाहिलं, तेव्हा त्याला दिशा बालकनीतून खाली पडलेली दिसली.

दिशाचा मृत्यू कधी आणि कसा झाला?

8 जून 2020 रोजी, दिशा सालियनचा मुंबईतील मालाड येथील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्यानंतर काहीच दिवसांत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, सुशांतच्या मृत्यूवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी जोडलं गेलं. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू दिशा सालियानच्या मृत्यूनंतर अवघ्या काहीच दिवसांत झाला होता. सुशांतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला. रिपोर्ट्सनुसार, दिशा सालियाननं आत्महत्या केली होती. मात्र, यामागे षडयंत्र असल्याचे आरोप काही जणांनी केले होते.  

दिशाच्या मृत्यूप्रकरणी काय तपास झाला?

28 वर्षीय दिशा सालियनच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यू (ADR) अशी नोंद केली होती. ऑगस्ट 2021 मध्ये पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्टही दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपासही बंद केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात कटाचा कोणताही पुरावा मिळालेला नव्हता. त्यानंतर सीबीआयनं सुशांत प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) दिशा सालियानच्या मृत्यूला अपघात असल्याचं म्हटलं होतं. 

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आलं होतं. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.  

हे प्रकरण न्यायालयातही पोहोचलेलं?

ऑक्टोबर 2020 मध्ये, सुशांत सिंह राजपूत प्रकरणासह दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय तपासासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयानं सीबीआय तपासाच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला होता. न्यायालयानं याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्यास आणि त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं होतं.

त्याच वेळी, नोव्हेंबर 2020 मध्येच, मुंबई उच्च न्यायालयानं दिशा सालियानच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. दिल्लीचे वकील पुनीत धांडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिशा सालियनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी, अशी विनंती त्यांनी आपल्या याचिकेत केली होती. न्यायालयानं ही याचिका देखील फेटाळून लावली आणि दिशाच्या मृत्यूबाबत कोणाकडे काही पुरावे असतील तर तो पोलिसांशी संपर्क साधू शकतो, असं स्पष्ट सांगितलं होतं.

सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंवर सातत्यानं आरोप 

दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. परंतु, ठाकरे कुटुंबीयांकडून मात्र या प्रकरणी संयमाची भूमिका घेतली जातेय. आरोप-प्रत्यारोप होत असतानाच साधारणतः वर्षभरापूर्वी या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशातच आता याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार आहे. 

[ad_2]

Related posts