Sharad Pawar Vs Ajit Pawar Ncp Crisis Notice From Legislative Council To Both Factions Of NCP Order To Submit Reply Within Seven Days Jayant Patil Jitendra Awhad Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : शिवसेना (Shivsena) कोणाची? हा वाद शिंदे गट आणि ठाकरे गट (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये गेल्या वर्षभरापासून सुरू असतानाच आता याच मार्गावरून राष्ट्रवादी (NCP) कोणाची? या असा वाद रंगला आहे. आता या दोन्ही पक्षांची कायदेशीर लढाई सुरू आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज (8 डिसेंबर) विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सात दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटिसांमधून देण्यात आले आहेत. 

सात दिवसांमध्ये आपलं उत्तर सादर करण्याचा आदेश

राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या दाखल केलेल्या याचिकेनंतर या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, आदिती झटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या जितेंद्र आवड यांच्या याचिकेवरून रामराजे नाईक निंबाळकर यांना नोटीस काढण्यात आली आहे. दरम्यान अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांच्याकडून दाखल याचिकेत एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड यांच्या नावाचा समावेश आहे. दोन्ही गटांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांमध्ये आपलं उत्तर सादर करण्याचा आदेश या नोटीसमधून देण्यात आला आहे. 

म्हणणं लेखी स्वरुपात देण्याचे आदेश

नोटीसीमध्ये पक्षांतराच्या कारणावरून सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषद सदस्य नियम 1986 अंतर्गत आपलं म्हणणं लेखी स्वरुपात सात दिवसात देण्याचे उपसभापती यांनी विधानसभा परिषद सदस्यांना निर्देश दिले आहेत. सात दिवसांमध्ये उत्तर न आल्यास आपलं याबाबत काहीचं म्हणणं नसल्याचे गृहित धरून सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असाही नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

दुसरीकडे, राष्ट्रवादी कोणाची? यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात भूमिका मांडण्यात आली आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाचा एकमेकांवर बनावट शपथपत्रं सादर केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो असा सवाल शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्षपदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts