Google Play Remove Fake Loan Apps Who Make Fraud With User Here Is List Of Apps

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cyber Fraud :  युजर्सचे  संरक्षण करण्यासाठी गुगलने Google नवीन पावले उचलत आहे. गुगलने अलीकडेच 18 स्पाय लोन अॅप्स (Loan Apps) हे प्ले स्टोअरमधून डिलीट केले आहेत. लाखो लोकांनी हे अॅप्स प्ले स्टोअरवरून डाऊनलोडही केले होते. सॉफ्टवेअर कंपनी ईएसईटीने (ESET) यासंदर्भात एक नवीन अहवालही जारी केला आहे. 18 अॅप्स हे ‘स्पायलोन’ अॅप्स  (Spy Loan Apps) म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे अॅप्स कोणतीही माहिती न देता यूजर्सचा डेटा चोरत होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स असतील तर तुम्ही  डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्ज घेणाऱ्या युजर्सना ब्लॅकमेल करण्यासाठी या अॅप्सचा वापर करण्यात आला. या डेटाच्या आधारे ते वापरकर्त्याला कर्जाची परतफेड करण्यास भाग पाडायचे आणि जास्त व्याजाची मागणीही करायचे.

ESET संशोधकांनी युजर्सची फसवणूक करणाऱ्या अॅपची ओळख पटवली आहे. फसवणूक करणाऱ्या या अॅप्सने आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियातील वापरकर्त्यांना लक्ष्य केले. गुगलला याबाबत माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत हे 17 अॅप काढून टाकले. त्यामुळे ज्या युजर्सनी हे अॅप डाऊनलोड केले आहे त्यांनीही ते त्वरित डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. 

कोणते अॅप गुगलने केले डिलीट?

AA Kredit, Amor Cash, GuayabaCash, EasyCredit, Cashwow, CrediBus, FlashLoan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Finupp Lending, 4S Cash, TrueNaira, EasyCash

अशा परिस्थितीत तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप्स असतील तर तुम्ही ते लगेच डिलीट करावेत. या अॅपमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. मात्र, किती भारतीयांच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स आहेत याची माहिती कंपनीकडून देण्यात आली नाही. मात्र, हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर हे अॅप्स तातडीने डिलीट करावेत. 

परदेशातून चालणाऱ्या 100 वेबसाईट्स सरकारकडून बंद

सायबर गुन्ह्यांचा (Cyber Crime) सामना करण्यासाठी सरकारकडून नवनवीन पद्धती अवलंबल्या जात आहेत. अलीकडे सरकारने बेकायदेशीर गुंतवणूक आणि अर्धवेळ नोकरीची फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्सवर कारवाई केली आहे. वास्तविक या वेबसाईट्स युजर्सची दिशाभूल आणि आर्थिक फसवणूकही करत होत्या. या वेबसाइट्स परदेशातून हाताळल्या जात होत्या आणि त्यांचे भारतात मोठे नेटवर्क होते, अशी माहितीदेखील समोर आली आहे. 

गेल्या आठवड्यात इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत युनिटने वर्टिकल नॅशनल सायबर क्राइम थ्रेट अॅनालिटिक्स युनिटच्या मदतीने अशा वेबसाईट्सची पडताळणी केली होती. या कालावधीत, गुंतवणूक आणि टास्क-आधारित अर्धवेळ नोकरीच्या फसवणुकीत गुंतलेल्या 100 वेबसाइट्सची ओळख पटवण्यात आली आणि त्या ब्लॉक करण्यात आल्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 चा वापर करून या सर्व वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या.

 

[ad_2]

Related posts