Iphone 14 And IPhone 14 Plus Best Offers In Flipkart Big Year End Sale Price 14000 Cuts In Price

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iphone 14 and iPhone 14 Plus best offers : तुम्हाला आयफोन घ्यायचाय? तर आता तुमचं आयफोन विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. फ्लिपकार्ट पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना कमी किंमतीत आयफोन खरेदी करण्याची संधी देत आहे. फ्लिपकार्ट बिग इयर एंड सेल सुरू झाला असून पुन्हा एकदा 5G सपोर्ट करणारे लोकप्रिय आयफोन मॉडेल्स सेलमध्ये भरघोस डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. येथे आम्ही तुम्हाला आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसवरील डील्सबद्दल सांगत आहोत. येथे आम्ही तुम्हाला आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसच्या बेस 128 जीबी फोनवरील ऑफरबद्दल सांगत आहोत

आयफोन 14 मध्ये फ्लॅट 11 हजार स्वस्त

आयफोन 14 च्या 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची वास्तविक किंमत 69,990 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग इयर एंड सेलमध्ये फोनवर 10,901 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. म्हणजेच इथे तुम्ही थेट सुमारे 11 हजार रुपयांची बचत होणार आहे. डिस्काउंटनंतर फोनची किंमत फक्त 58,999 रुपये असेल. बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही त्याची किंमत आणखी कमी करू शकता. फ्लिपकार्ट या फोनवर 34,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे.

आयफोन 14 प्लस फ्लॅट 14 हजार स्वस्त

आयफोन 14 प्लस 128 जीबी व्हेरियंटची  किंमत 79,990 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग इयर एंड सेलमध्ये फोनवर 13,901 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. म्हणजेच इथे तुम्ही थेट सुमारे 14 हजार रुपयांची बचत होणार आहे. डिस्काउंटनंतर फोनची किंमत फक्त 65,999 रुपये असेल. बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही त्याची किंमत आणखी कमी करू शकता. फ्लिपकार्ट या मॉडेलवर 34,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील देत आहे.

आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसचे फिचर्स

दोन्ही फोन जवळजवळ सारखेच आहेत, फक्त डिस्प्लेच्या आकारात फरक आहे. आयफोन 14 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे तर आयफोन 14 प्लसमध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले 1200 निट्स पीक ब्राइटनेस, एचडीआर आणि सिरॅमिक शील्ड प्रोटेक्शनसह येतात. हे दोन्ही फोन अॅपलच्या A15 बायोनिक प्रोसेसरसह सुसज्ज असून 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज पर्यायांसह येतात. हे फोन iOS 17 वर काम करतात.

फोटोग्राफीसाठी दोन्ही मॉडेल्समध्ये 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील बाजूस 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. आयफोन 14 मध्ये 3279 एमएएच बॅटरी असून 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक वेळ आहे. आयफोन 14 प्लसमध्ये 4325 एमएएच बॅटरी आहे, जी 26 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ देते. दोन्हीमध्ये २० वॉट चार्जिंग सपोर्टसह लाइटनिंग पोर्ट आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, जीपीएस सपोर्ट आहे.

इतर महत्वाची बातमी-

 Fake Loan Apps : लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना गुगलचा दणका, बोगस अॅप डिलीट; पाहा यादी

[ad_2]

Related posts