Chhagan Bhujbal Indapur Maharashtra News Update Abp Majha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Chhagan Bhujbal Indapur : ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी छगन भुजबळ इंदापुरमध्ये दाखल पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळांची पहिली ओबीसी एल्गार सभा ही पुणे जिल्ह्याच्या इंदापूर मध्ये होणार आहे. दुपारी १ वाजता ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास दीड लाख ओबीसी बांधव येतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.इंदापूर शहरालगत असलेल्या शंभर फुटी मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे ज्या मैदानात मनोज जरांगे पाटलांची सभा झाली होती त्याच मैदानात ओबीसी मेळावा होत आहे. या ओबीसी एल्गार मेळाव्याला छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, बबनराव तायवाडे, लक्ष्मण गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

[ad_2]

Related posts