Pune News 100 Rooms Will Be Built In Alandi Through Public Participation Soon Says Chandrakant Patil

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  आपला अंतिम काळात श्रीक्षेत्र पंढरपूर (Pandharpur) किंवा आळंदी येथे व्यतित करावा अशी अनेक वारकऱ्यांची इच्छा असते. त्यामुळे अशा वारकऱ्यांना आळंदी  (Alandi)  येथे राहता यावे  यासाठी लवकरच लोकसहभागातून  शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार आहे. ही  माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आषाढी वारीनंतर भूमिपूजन करुन या इमारतीच्या कामाची सुरुवात करण्यात येईल अशी घोषणा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, आषाढी वारीचे महत्त्व सर्वांना समजावून सांगण्यासाठी यंदाच्या आषाढी वारीदरम्यान तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित उत्तम नाट्यप्रयोग पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी होणार आहेत. याचे 24 प्रयोग होणार असून नाट्य प्रयोगादरम्यान पालखीच्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहेत. त्याचा पहिला प्रयोग श्री क्षेत्र देहू (Dehu) येथे होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी  11 जूनला आळंदीमधून प्रस्थान

 वारकरी संप्रदायाची एक महत्वाची परंपरा म्हणजे वारीची परंपरा. काही दिवसातच आषाढी वारीला सुरुवात होणार असून राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी  11 जूनला आळंदीमधून प्रस्थान करेल. तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये  पोहचेल आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी (Vitthal) भेट घडेल. वारकरी सांप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली आहे. 

कसा असेल आषाढी वारी (Ashadhi Wari) पालखी सोहळा?

सोहळ्यात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस पाहुणचार घेत 14 जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल. 14 आणि 15 जूनला सासवड मुक्काम, 16 जूनला जेजुरीकडे प्रस्थान, 17 जूनला जेजुरीला मुक्काम, 18 जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. 19 जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि 20 जूनला तरडगाव, 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि 22 जूनला फलटणमध्ये मुक्काम, 23 जूनला नातेपुते, 24 जूनला माळशिरस मुक्काम, 25 जूनला वेळापूर, 26 जूनला भंडी शेगाव, 27 जूनला वाखरी, 28 जूनला पंढरपूर, 29 जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल. पालखी सोहळ्यात फलटण येथे 21 जून, बरड येथे 22 जूनला एक दिवसांच्या मुक्कामासाठी सोहळा विसावणार आहे. 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि मुक्काम होईल. 22 जूनला बरड मुक्काम असेल. दिनांक 3 जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा पांढरी नगरीत विसावेल. 3 जुलैला गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी अलंकापुरीकडे निघणार आहे.

हे ही वाचा :

Ashadhi Wari 2023 : आषाढ वारीसाठी अंकली इथून शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान

[ad_2]

Related posts