Smart Driving Tips In Winter Session Road Safety Driving In Fog Safety Tips

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Smart Driving Tips : सध्या हिवाळा (Winter) सुरु आहे. त्यात न्यू इयरमुळे अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. त्यात अनेकांना रोड ट्रिप करण्याची हौस असते. त्यामुळे अनेक लोक आपल्या गाडीने फिरण्यासाठी निघत असतात. मात्र रोज गाडी चालवणं आणि दूरच्या पल्ल्यावर जाण्यासाठी गाडी चालवणं यात मोठा फरक आहे. त्यातच आता सध्या हिवाळा सुरु असताना पहाटे किंवा रात्री मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरलेली असते. त्यामुळे गाडीत प्रवास करत असताना बाकी प्रवाशांच्या जरी मजा येत असली तरीही गाडी चालवणाऱ्यासमोर धुक्यातून गाडी चालवणं मोठं आव्हान असतं. आतापर्यंत धुक्यामुळे अनेक अपघात झाले आहेत आणि अनेकांनी जीवदेखील गमावला आहे. त्यामुळे  त्यामुळे या सीझनमध्ये ड्रायव्हिंग करताना थोडं जास्त लक्ष देण्याची गरज आहे, त्यासाठी आम्ही पुढे काही टिप्स देणार आहोत.  

लो बीमवर लाईट ठेवा 

हिवाळ्यात धुक्यात गाडी चालवताना हाय बीमवर लाईट ठेवू नका, तर लो बीमचा वापर करा. त्यामुळे रस्ता दिसणं काही प्रमाणात सोपं होईल. दुसरीकडे तुमच्या कारमध्ये फॉग लाईट असतील तर त्यांचा वापर करणं योग्य ठरेल. 

कमी वेग आणि जास्त अंतर ठेवा …

धुक्यादरम्यान फिरताना आपल्या गाडीचा वेग कमी ठेवा, जेणेकरून गरजेनुसार गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळ मिळेल. त्याचबरोबर पुढे धावणाऱ्या गाड्यांपासून अंतर ठेवा. जेणेकरून अचानक ब्रेक लागल्यास अपघात वगैरे होण्याची शक्यता कमी होऊ शकेल. 

गाडी चालवताना सावध राहा…आपली कार सुरक्षित ठिकाणी पार्क करा 

धुक्यात गाडी चालवत असताना नेहमी सावध राहा. कारण कमी दिसत असल्यामुळे तुम्हाला अचानक कोणत्याही गोष्टीचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला सावरायला फारसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे मोबाईल वापरू नका, संगीत ऐकू नका, जेणेकरून मूड डायव्हर्जन टाळता येईल. गाडीच्या खिडक्या थोड्या खाली ठेवल्या तर बरे होईल. जेणेकरून बाहेरचा आवाजही ऐकू येईल. 

धुके जास्त आहे आणि रस्त्यावर काहीच दिसत नाही, असे वाटल्यास रस्त्याच्या कडेला सुरक्षित जागा पाहून आपली गाडी पार्क करा आणि धुके कमी होण्याची वाट पहा. जेणेकरून तुमचा प्रवास उशीरा, पण सुरक्षित होऊ शकेल. यापूर्वी धुक्यामुळे अनेकांचे अपघात झाले आहेत आणि अनेकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

iphone 14 and iPhone 14 Plus best offers : काय सांगता? iphone 14 आणि iPhone 14 Plus वर 14 हजारांची सूट ; पाहा भन्नाट ऑफर्स..

[ad_2]

Related posts