One Plus Mobile Phone Offers Oneplus 10 Pro 5g At 22000 Discount On Amazon Here Is How This Deal Work

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

OnePlus 10 Pro 5G : वनप्लस नवीन वर्षात वनप्लस 12 (Oneplus 12 Mobile phone) स्मार्टफोन लाँच करणार आहे. यासोबत 12 R देखील लाँच होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही फोन भारतात 23 जानेवारीला लाँच केले जाणार आहेत. नवीन फोन लाँच होण्यापूर्वी जुन्या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. वनप्लस 10 प्रो 5जी वर कंपनी 22,000 रुपयांची सूट देत आहे. मात्र, ही सूट तुम्हाला 2 वेगवेगळ्या भागांमध्ये मिळते. सध्या सगळीकडे इयर एन्ड सेल सुरु आहे. त्यातही मोठी सूट मिळत आहे. कशी आहे ऑफर आणि किती मिळेल सूट पाहुयात…

काय आहे ऑफर?

ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर वनप्लस 10 Pro 5G  वर सध्या 17,000 रुपयांचा कूपन डिस्काउंट दिला जात आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5000 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय कंपनी 32,050 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. जर तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला चांगली एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते. सर्व डिस्काउंटनंतर तुम्ही फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.

वनप्लस 10 प्रो 5 जी मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो ज्यात ओआयएस सपोर्टसह 48 MP सोनी आयएमएक्स 789 लेन्स, 50 एमपी अल्ट्रावाइड लेन्स आणि 8 एमपी टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा क्यूएचडी+ फ्लुइड एमोलेड डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. मोबाइल फोनच्या सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. वनप्लस 10 Pro 5 G मध्ये 80 W सुपरव्हीओसी चार्जिंगसह 5000 एमएएच बॅटरी आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपवर काम करतो जो गेमिंगसाठी उत्तम आहे.

वनप्लस 12 मध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 SoC मिळण्याची अपेक्षा आहे. जी आपल्याला उत्कृष्ट परफॉर्मन्स देईल. यात BOE X1 OLED LTPO  डिस्प्ले असेल जो क्रिस्टल-क्लिअर 2K रिझोल्यूशनचा आहे.  आयक्यूओ 12 5 G मध्ये 64 MP टेलिफोटो कॅमेरा कंपनी आहे जी 100 X झूमिंगसह येते. याशिवाय फोनमध्ये 50 MP प्रायमरी सेन्सर, 32 MP सेल्फी कॅमेरा आणि 100 W वायर्ड आणि 50W  वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,400 mAh दमदार बॅटरी मिळेल.

इतर महत्वाची बातमी-

WhatsApp HD Photo : Whatsapp वर आता HD फोटो शेअर करा; HD फोटो-व्हिडिओ शेअरिंग फीचर कसं वापरायचं?

Nothing Phone 2a : नथिंग कंपनीचा बजेट फ्रेंडली फोन, भन्नाट फिचर्स लीक; लवकरच होणार लाँच

[ad_2]

Related posts