Keerthana Balakrishnan Daughter Of A Taxi Driver And Sajna Sajeevan From A Tribal Community In The Mumbai Indians Team

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Women’s Premier League : महिला प्रीमियर लीगचा (WPL) लिलाव मुंबईत आयोजित करण्यात आला. या लिलावात अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. त्याचबरोब दोन नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. मुंबई इंडियन्सने 15 लाख रुपये खर्च करून सजना सजीवनला (Sajana Sajeevan) आपल्या संघात घेतलं आहे. सजना सजीवन कुरिचिया आदिवासी समाजातील आहे. अशाप्रकारे, सजना सजीवन महिला प्रीमियर लीगमध्ये खेळणारी दुसरी आदिवासी क्रिकेटपटू ठरली आहे. मागील वर्षी केरळमधील वायनाड येथील आदिवासी समुदायातील मिन्नू मणी महिला प्रीमियर लीगमध्ये खेळली होती.

सजना सजीवनचा प्रवास चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही

पण सजना सजीवनचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का? खरे तर सजना सजीवनचा प्रवास चित्रपट कथेपेक्षा कमी नाही. बालपणी, सजना सजीवन मनंथवडीच्या बाहेरील तिच्या घराजवळील भाताच्या शेतात नारळाच्या ढांपीपासून बनवलेल्या बॅटने आणि प्लॅस्टिकच्या बॉलने मैत्रिणी आणि चुलत भावांसोबत क्रिकेट खेळत असे. वयाच्या 17 व्या वर्षापर्यंत महिला क्रिकेटची माहिती नव्हती. पण यानंतर नशीब असे चमकले की आज ती महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससारख्या मोठ्या संघात सामील झाली आहे.

‘आता माझी प्रतिभा जगाला दाखवण्याची जबाबदारी माझी’

सजना सजीवनने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, ती गेल्यावर्षीही लिलावचा भाग होती, परंतु कोणीही खरेदीदार मिळाला नाही. गेल्या WPL लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने माझी निवड न केल्याने मी नाराज झालो होतो. पण मी मेहनत करत राहिलो तर माझ्या प्रतिभेची ओळख होईल हे मला माहीत होतं. काही दिवसांपूर्वी मी त्यांच्या चाचण्यांना हजेरी लावली होती आणि मला खूप आनंद झाला की मुंबई इंडियन्ससारख्या संघाने मला विकत घेतले आहे. आता माझे टॅलेंट जगाला दाखवण्याची जबाबदारी माझी आहे, असेही ती म्हणते. 

टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी झाली लखपती 

दुसरीकडे, इंडियन्सने कीर्तना बालकृष्णनला (Keerthana Balakrishnan) महिला प्रीमियर लीगच्या लिलावात 10 लाख रुपयांना विकत घेतले. कीर्तना बालकृष्णन आणि त्यांच्या कुटुंबासाठी 9 डिसेंबर हा खास दिवस होता. मात्र, कीर्तनाचा प्रवास चढ-उतारांनी भरला आहे. किर्तनाचा प्रवासही सोपा नव्हता, पण हिंमत गमावली नाही.

टॅक्सी चालक वडिलांचे स्वप्न पूर्ण केले

कीर्तना बालकृष्णन हे अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. कीर्थनाचे वडील टॅक्सी चालक आहेत, परंतु त्यांनी आपल्या मुलीची स्वप्ने पूर्ण करण्याच्या मार्गात कधीही अडथळा येऊ दिला नाही. कीर्तना बालकृष्णननेही वडिलांची मेहनत व्यर्थ जाऊ दिली नाही, आता कीर्तना बालकृष्णन महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससारख्या मोठ्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.

महिला प्रीमियर लीगमध्ये खेळणारी तामिळनाडूची पहिली क्रिकेटपटू

कीर्तना बालकृष्णन ही महिला प्रीमियर लीगमध्ये खेळणारी तामिळनाडूची पहिली क्रिकेटपटू आहे. याआधी कीर्तना बालकृष्णन तामिळनाडू महिला संघ तसेच इंडिया वुमेन्स ग्रीन, साउथ झोन वुमन आणि ऑरेंज ड्रॅगन या संघांसाठी खेळली असली तरी कीर्तना बालकृष्णन ही महिला प्रीमियर लीगमध्ये खेळताना प्रथमच दिसणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या



[ad_2]

Related posts