Wtc Final 2023 India Vs Australia New Rules Soft Signal Flood Lights Helmet World Test Championship

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WTC Final 2023, Ind vs Aus: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यात टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील ओव्हल ग्राउंडवर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियानं काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत 2-1 नं पराभूत केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास काहीसा वाढलेला आहे. अशातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीतही कांगारूंना पाणी पाजून टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदाचा खिताब पटकावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. 

तसं पाहिलं तर टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. यापूर्वी टीम इंडियानं 2021 मध्येही या स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळला होता. त्यानंतर साउथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून आठ विकेट्सनी पराभव झाला होता. यंदा मात्र टीम इंडियाकडे मागचा पराभव विसरून WTCच्या ट्रॉफीवर कब्जा करण्याची सुवर्णसंधी आहे.

WTCच्या ब्लॉकबस्टर फायनल मॅचबाबत दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तसेच, WTCचा अंतिम सामना क्रिकेटमधील बदललेल्या नियमांसाठीही चर्चेत आहे. 7 जूनपासून खेळवण्यात येणाऱ्या सामन्यापासूनच क्रिकेटविश्वात करण्यात आलेले अनेक बदल लागू होणार आहेत. 

‘सॉफ्ट सिग्नल’ रूल ‘या’ सामन्यापासून क्रिकेट जगतातून आउट 

अंतिम सामन्यात ‘सॉफ्ट सिग्नल’ नियम वापरला जाणार नाही. म्हणजेच, मैदानावरील अम्पायर्सना निर्णयाचा संदर्भ देण्यापूर्वी ‘सॉफ्ट सिग्नल’ देण्याचा अधिकार राहणार नाही. यापूर्वी, मैदानावरील अम्पायर्सनी संशयास्पद निर्णयांबाबत तिसऱ्या अम्पायरची मदत घेतल्यास त्याला ‘सॉफ्ट सिग्नल’ द्यावा लागत होता. हा नियम 1 जूनपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. पण इथून पुढे हा नियमच क्रिकेटविश्वातून हद्दपार करण्यात आला आहे. 

‘सॉफ्ट सिग्नल’ नियमावरुन अनेकदा गदारोळ झाला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान, मार्नस लॅबुशेनला मैदानावरील अम्पायर्सनी सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट केलं होतं. स्लिपमध्ये पकडलेला हा कॅच क्लीन नव्हता, पण मैदानावरील अम्पायर्सचा निर्णय रद्द करण्यासाठी थर्ड अम्पायरकडे पुरेसे पुरावे नव्हते, त्यामुळे मैदानावरील अम्पायर्सचाच निर्णय कायम ठेवण्यात आला. 

फ्लड लाईट्समध्ये खेळवली जाऊ शकते WTC ची फायनल 

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्‍या WTC फायनलमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि नैसर्गिक प्रकाश (Natural Light)  तितकासा चांगला नसेल, त्यामुळे तर फ्लडलाइट्स चालू करता येतील. तसेच, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सामन्यासाठी 12 जून रोजी राखीव दिवस (सहावा दिवस) ठेवण्यात आला आहे. 

हेल्मेटबाबतही ‘हा’ नवा नियम 

आयसीसीनं 1 जूनपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान अटीतटीच्या लढतीत हेल्मेट घालणं बंधनकारक केलं आहे. आता वेगवान गोलंदाजांचा सामना करताना फलंदाजाला हेल्मेट घालावं लागणार आहे. जेव्हा विकेटकिपर स्टंपजवळ उभे राहतात आणि फिल्डर्सही बॅटर्सच्या अगदी जवळ येऊन उभे राहतात, तेव्हा फलंदाजांना हेल्मेट घालणं अनिर्वाय असणार आहे. 

आयसीसीनं एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील फ्री हिट्सच्या नियमांमध्येही किरकोळ बदल केले आहेत. आता फ्री हिटच्या वेळी जर बॉल स्टंपला लागला आणि बॅट्समननं त्यावर धावून रन्स काढले, तर ते रन्सही स्कोअरमध्ये जोडले जातील. म्हणजेच, फ्री हिट दिल्यावर जर बॅटर स्टंप आऊट झाला आणि तरिदेखील त्यानं रन्स काढले, तर ते रन्स स्कोअरमध्ये पकडले जाणार. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचे डिटेल्स 

• तारीख : 7 ते 11 जून, 2023 
• ठिकाण : द ओवल मैदान, लंडन 
• संघ : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
• रिझर्व डे : 12 जून

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

WTC Final Ind vs Aus: विराट कोहली की स्टीव्ह स्मिथ… कोण मोडणार सर्वात आधी रिकी पॉटिंग, सुनील गावस्करांचा रेकॉर्ड?

[ad_2]

Related posts