[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pandharpur Temple : विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा लेखापरीक्षण अहवालातील निष्कर्ष<br />पंढरीला येणारे वारकरी मोठ्या भक्तिभावाने विठूराया लाडूचा प्रसाद घेऊन जातात. प्रसादाचा हा लाडू निकृष्ट दर्जाचा असून तो तयार होणाऱ्या कारखान्यात स्वच्छतेचा अभाव आहे, असा निष्कर्ष लेखापरीक्षण अहवालात नोंदवण्यात आला आहे. तसंच या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो, असा इशारा देण्यात आलाय. नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल आणि त्यावरील अनुपालन अहवाल सादर झाला. त्यात प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूसंदर्भात गंभीर बाबी समोर आल्या आहेत.</p>
[ad_2]