235 रुपयांसाठी मुलांच्या जीवाशी खेळ; तो Video पाहून तुमचाही संताप होईल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Children Ride A Tiger For Photos: वाघ जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राणी. वाघामुळं जंगल टिकून राहतं. असं नेहमीच सांगितली जातं. मात्र जसजसा काळ बदलला तसं वाघ जंगलाबरोबरच सर्कसमध्येही दिसू लागला. चीनमधील एका सर्कशीत एक विचित्र ऑफर काढण्यात आली आहे. यामुळं सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला आहे.  या ऑफरनुसार, कोणताही व्यक्ती 235 रुपये देऊन त्यांच्या मुलाला वाघाची सवारी करुन देऊ शकतात. तुम्हालाही वाचून आश्चर्य वाटलं असेल ना. कोणतेही आई-वडिल त्यांच्या मुलाच्या जीवाशी असा खेळ करायला कसे राजी होत होते

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, हे प्रकरण गुआंग्शी प्रांतातील टियानडॉन्ग काउंटी येथील आहे. जिथे एका सर्कसमध्ये वाघांकडून मनोरंजन करण्यात येते. त्याचबरोबर इथे लोकांना एक विचित्र ऑफरही देण्यात येत आहे. जर 20 युआन म्हणजे जवळपास 235 रुपये दिल्यास मुलांना वाघांच्या पाठीवर बसून एक फरफटका मारता येणार आहे. तसंच, मुलांना वाघाच्या पाठीवर बसून फोटोदेखील काढू शकतात. या सगळ्या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुन्ही पाहू शकता की, वाघाचे मागचे पाय एका साखळीने बांधले गेले आहेत. तर पुढचे पाय खुले आहेत. त्यामुळं अशा परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. ट्विटर अकाउंट  @Ellis896402 वरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात पिंजऱ्यात वाघाच्या समोर एक फोटोग्राफर बसला आहे. तर, वाघाच्या वर बसून फोटो काढून घेण्यासाठी अनेक लहान मुलांची रांग लागली आहे. त्यानंतर एकामागोमाग एक अशी अनेक मुलं वाघावर बसून फोटो काढून येत आहेत. तर, वाघ तिथून उठण्यासाठी धडपडत आहे. 

हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. तर, युजर्सनी मुलांच्या आई-वडिलांना सुनावलं आहे. तसंच, सर्कसच्या या विचित्र ऑफरवरही टीका केली आहे. या ऑफरसाठी मुलांचा जीव पणाला लावल्याचा आरोप केला आहे. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. सर्कस बंद करण्याची नोटिस देण्यात आली आहे. त्याचबरोबर संचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यासही सुरुवात केली आहे. 

Related posts