[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Vande Bharat Express:काश्मीरमध्येही धावणार वंदे भारत एक्स्प्रेस,उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला कामाला वेग
वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करण्याची इच्छा अनेकांची असते. देशात सध्या ३४ मार्गांवर वंदे भारत ट्रेनची सेवा सुरु आहे. यातच आता काश्मीरमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याची तयारी भारतीय रेल्वेकडून केली जात आहे. नवी दिल्ली ते श्री माता वैष्णो देवी कटरा या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहे. त्यात आता उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला या मार्गावर वंदे भारत सुरू केली जाणार आहे. ही देशातील ४९ वी वंदे भारत ट्रेन ठरू शकते, असे सांगितले जात आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला या मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वे अधिकारी विविध चाचण्या घेत आहेत. यातील काही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. ही सेवा सुरु झाल्यानंतर जम्मू-श्रीनगर ३.५ तासांत शक्य होणार आहे.
[ad_2]