Ajit Pawar Will Meet Minister Amit Shah Agriculture News Farmers Onion Ethanol Milk Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar : शेती प्रश्नाच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम झालं आहे. कांदा उत्पादक (onion Farmers) शेतकऱ्यांसह ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. येत्या 15 डिसेंबरला अजित पवार हे अमित शाह यांची भेट घेणार आहे. रात्री 10 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली. 

राज्यात निर्माण झालेला कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न तसेच दूध दराचा प्रश्न याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. काल अमित शाह यांची आम्ही वेळ मागितल्याचे अजित पवार म्हणाले. त्यानुसार अमित शाह यांनी आम्हाला वेळ दिली आहे. शुक्रवारी म्हणजे 15 डिसेंबरला आम्ही विधीमंडळाचे कामकाज संपल्यावर दिल्लीला जाणार आहोत. तिथे रात्री 9 किंवा 10 वाजता अमित शाह यांची भेट घेतली जाणार असल्याच अजित पवार म्हणाले. 

जुन्या पेन्शन संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

जुन्या पेन्शन संदर्भात काल बैठक झाली. या बैठकीला विविध संघटनेचे नेते उपस्थित होते. जुन्या पेन्शनबाबत आम्ही अहवाल समोर ठेवल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्राचा याबाबतचा अभ्यास सुरू आहे. आम्ही याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे अजित पवार म्हणाले. 

त्या वक्तव्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो

पीएचडीबाबत माझ्या तोंडतून शब्द गेला काय दिवा लावला जाणार आहे. त्याचा गाजावाजा करण्यात आला. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त केली असल्याचे अजित पवार म्हणाले. अनेकांनी राजकीय नेत्यांवर पीएचडी केली. पीएचडी करण्यावर दुमत नाही. पीएचडी करण्याबाबत  विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी. अनेक जण विविध विषयात पीएचडी करतात. काहींनी आम्हाला समजलं जर्मन भाषेत पीएचडी केली तर अधिक फायदा होईल असे अजित पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

‘सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थखातं मागितलं होतं’, अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचा गौप्यस्फोट

[ad_2]

Related posts