Shiv Sena MLA Disqualification Result Update Preparing To Go To Supreme Court Again Rahul Narvekar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणात दोन लाख पानांचे कागदपत्रे तयार असून सहा निकाल (MLA Disqualification Result)  लागणार आहे.  या प्रकरणी 34  याचिकांचे सहा गटांत वर्गीकरण केल्यामुळे विविध सहा निकाल लागणार आहे. विधीमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही 20  डिसेंबर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

विधानसभेत  अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत पूर्ण होणार आहे.  21 ते 31 डिसेंबर कालावधीत निकालाचे लेखन अशक्य आहे. निकालाचे लेखन करण्यासाठी मात्र  अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. एक हजारांहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे वाचन करण्याचे आवाहन विधीमंडळासमोर आहे. नागपूरवरून मुंबईत कागदपत्रे नेण्यासाठी ही वेळ लागणार आहे. परिणामी या पार्श्वभूमीवर सहा निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  

सर्वोच्च न्यायालयात मागणार तीन आठवड्यांचा वेळ 

विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांची वेळ मागितली जाणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात विधीमंडळाकडून याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे.  सातत्याने सकाळ आणि संध्याकाळी जवळपास दररोज सात तास सुनावणी घेऊन साक्ष पूर्ण झालेली आहे. आता पुढील कार्यवाही पूर्ण करून हे प्रकरण निकालासाठी बंद करण्याचे मी प्रस्तावित केले आहे. त्या अनुषंगाने सर्वांच्या सहकार्याने 20 तारखेपर्यंत हे कार्य पूर्ण करायचा माझा प्रयत्न असल्याचे  विधानसभा अध्यक्ष  म्हटले. 

 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज, 12 डिसेंबर रोजीच उलट तपासणी संपवण्याचे निर्देश दिले होते.  आज,  12 डिसेंबर रोजी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि शेवटी भरत गोगावले यांची उलट साक्ष नोंदवण्यात आली. आता, 13 डिसेंबरपासून ते तीन दिवस अर्थात 15 डिसेंबरपर्यंत  लेखी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर अंतिम सुनावणी सोमवारी 18 डिसेंबरपासून सुरू होणार. अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत पूर्ण होणार आहे.  दोन्ही गटाच्या संमतीने रद्द करण्यात आली आहे. 

हे ही वाचा :

MLA Disqualification Case : गुवाहाटीचा खर्च कोणी केला? केसरकर म्हणतात हा माझा खासगी प्रश्न; ठाकरे गटाच्या वकिलांकडून प्रश्नांचा भडिमार

                               

[ad_2]

Related posts