[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Weather : भारत (India) असा देश आहे की, जिथे तुम्ही एकाच वेळी विविध प्रकारच्या हवामानाचा आनंद घेऊ शकता. म्हणजे उन्हाळ्यात थंडीचा आनंद घ्यायचा असेल तर लडाख किंवा काश्मीरला जा. जर तुम्हाला हिवाळ्यात उबदार वाटायचे असेल तर गोवा किंवा दक्षिण भारतातील कोणत्याही किनारी भागात जा. मात्र, भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथं हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते आणि उन्हाळ्यात तीव्र उष्णता असते.
राजस्थानातील चुरु जिल्हा
राजस्थान (Rajasthan) हे उष्ण राज्य म्हणून ओळखले जाते. परंतू, असे अनेक भाग आहेत जिथे हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडते. यापैकी एक क्षेत्र म्हणजे चुरु (Churu). चुरुमध्ये एवढी थंडी असते की, रात्री तापमान उणेपर्यंत पोहोचते.
मागील वर्षी चुरुमध्ये किती होती थंडी
27 डिसेंबर 2022 च्या हवामान खात्याच्या अहवालानुसार, चुरूचे तापमान किमान -0.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तर, 28 डिसेंबर 1973 रोजी तेथे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले होते आणि ते -4.6 अंश सेल्सिअस होते.
चुरु खूप उष्ण शहर
हिवाळ्याबरोबरच चुरुला कडक उन्हाचा अनुभव देखील येतो. उन्हाळ्यात हे शहर भट्टी बनते. येथील तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. जून 2021 मध्ये तिथे कमाल तापमान 51 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळेच या शहरातील नागरिकांना हिवाळ्यात थंडी आणि उन्हाळ्यात कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागतो.
असे का घडते?
हवामानातील या चढउतारांचे कारण म्हणजे चुरुची भौगोलिक स्थिती. वास्तविक, चुरुच्या आजूबाजूचे क्षेत्र हे उष्णकटिबंधीय उच्च दाबाचे क्षेत्र आहे. याशिवाय चुरु ज्या अक्षांशावर वसलेले आहे तिथे वारे वरपासून खालपर्यंत वाहतात. त्यामुळं दिवसा खूप उकाडा आणि रात्री तितकीच थंडी असते. या वाऱ्यांमुळं मोसमात कडाक्याची थंडी आणि उष्णताही होते.
महत्त्वाच्या बातम्या:
यावर्षी थंडीचा पॅटर्न वेगळाच, दिवसा थंडी पहाटे मात्र कमी; हवामानाची नेमकी परिस्थिती काय?
[ad_2]