Sharmila Thackeray Reaction On Aaditya Thackeray Sit Investigation In Disha Salian Case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Sharmila Thackeray on Aaditya Thackeray:दिशा सॅलियन प्रकरणी चौकशी, शर्मिला ठाकरे म्हणाल्या आदित्य असं करेल असं वाटत नाही

मुंबई : दिशा सालियन (Disha Salian) मृत्यूप्रकरणात राज्यातील शिंदे सरकराने (CM Eknath Shinde) विशेष तपास यंत्रणा अर्थात SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे. याप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि सर्व सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे सातत्याने बोट दाखवलं आहे. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असा दावा सातत्याने नितेश राणे करत आले आहेत. एकीकडे हे सर्व असताना, तिकडे राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी आदित्य यांची पाठराखण केली आहे. 

मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल, चौकशा तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय, अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

 

[ad_2]

Related posts