Makarand Patil Will Soon Take Oath As A Minister, Ajit Pawar Hints About Maharashtra Cabinet Expansion

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारमध्ये आणखी एकदा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet expansion) होण्याची चिन्हं आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत.  गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असे मंत्रिमंडळ विस्ताराचे कथित मुहूर्त याआधीच हुकले आहेत. त्यानंतर आता पुन्हा हिवाळी अधिवेशनानंतर (Maharashtra Winter session) मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे वारे वाहात आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलं.  

अजित पवार यांच्या शेजारी साताऱ्याचे आमदार मकरंद पाटील बसले होते. त्यावेळी तुमच्या शेजारी बसलेल्या आमदारांचा शपथविधी कधी होणार, असा प्रश्न एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, लवकरच ते मंत्रिपदाची शपथ घेतील. 

कोण आहेत मकरंद पाटील? 

मकरंद पाटील हे साताऱ्यातील वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवेळी ते शरद पवारांसोबत दिसले होते. शरद पवारांच्या सातारा दौऱ्यात ते पवारांच्या गाडीतून प्रवास करताना दिसले. मात्र नंतर ते अजित पवार यांच्या गटात दाखल झाले. 

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी मकरंद पाटील उपस्थित होते. मात्र, त्यानंतर शरद पवार यांच्या कराड दौऱ्यावेळी आपण शरद पवार यांच्यासोबत आहे असं त्यांनी सांगितलं होतं. पण नंतर काहीच दिवसांनी मकरंद पाटील हे अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी निवासस्थानी उपस्थित राहिले होते. कार्यकर्त्यांसह भेटीसाठी दाखल झालेल्या मकरंद पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला होता.  

नव्या वर्षात मंत्रिपदाचं गिफ्ट? 

दरम्यान, नव्या वर्षात अजित पवार गटाला मंत्रिपदाचं गिफ्ट मिळू शकतं. अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपद वाट्याला येण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Sesssion)  संपताच मंत्रिमंडळ विस्तार  (Cabinet Expansion)  होण्याची शक्यता असल्याची माहिती  राष्ट्रवादीच्या (NCP)   विश्वसनीय सूत्रांनी  दिली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना नववर्षात  मोठं गिफ्ट मिळणार  असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा

दरम्यान, राज्यभरात गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत.अजित पवार गटातील आमदारांना मंत्रिपद तर शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांना पालकमंत्रिपदाबाबत उत्सुकता आहे. तिकडे भाजपने  आता मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश भाजपच्या सर्व आमदारांना दिले आहेत. त्यामुळे मंत्रिपदाची आस असलेल्या अनेकांची हिरमोड होऊ शकते.  

Ajit Pawar PC VIDEO : अजित पवार नेमकं काय म्हणाले?

 

संबंधित बातम्या 

[ad_2]

Related posts