IPhone 15 Offers IPhone 14 Offers Iphone 15 For Free Have You Also Fallen Into Trap Of This Message Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhone 15 Offers :  ॲपल (Apple) आयफोन 15 (iPhone 15)  लाँच झाल्यापासून खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तो खरेदी करण्याची ही उत्तम वेळ आहे. सध्या आयफोन 15, 15 Pro Max आणि आयफोन 14 वर मोठी सूट मिळत आहे. अॅपलच्या ऑथराइज्ड रिसेलर इमेजिन स्टोरमध्ये तुम्हाला ही सूट मिळणार आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर एक सेल्स बॅनर शेअर केला आहे. जाणून घ्या काय आहेत ऑफर्स?

आयफोन 15 आणि 15 प्रो मॅक्सवर भन्नाट ऑफर्स

अॅपलचा लेटेस्ट आयफोन 15 इमॅजिन स्टोअरवर 79,900 रुपयांऐवजी 77,503 रुपयांना खरेदी करु शकता. म्हणजेच तुम्हाला 2,397 रुपयांचा डायरेक्ट डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5,000 रुपयांची सूट दिली जात आहे. यानंतर हा फोन तुम्ही फक्त 72,503 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय आयफोन 15 प्रो मॅक्सवरही मोठी सूट दिली जात आहे. 1,59,900 रुपयांऐवजी 1,57,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच एचडीएफसी क्रेडिट कार्डवर 4,000 रुपयांची सूट दिली जात आहे, त्यानंतर फोनची किंमत 1,53,900 रुपये आहे.  याशिवाय आयफोन 15 प्लस देखील तुम्ही स्वस्तात ऑर्डर करू शकता.  प्रो मॉडेल्सवर ऑफर्स दिल्या जात आहेत. क्रोमामध्ये आयफोन 15 वर ही मोठी सूट देत आहे. नव्या मॉडेलवर तुम्ही 8000 रुपयांची बचत करू शकता.   

आयफोन 14 वर ऑफर 

अॅपलचे हे एक वर्ष जुने मॉडेल तुम्ही फ्लिपकार्टवरून मागवावे कारण इथे तुम्हाला हे मॉडेल इतरांपेक्षा खूप स्वस्त मिळणार आहे. आयफोन 14 फ्लिपकार्टवरून 58,999 रुपयांना खरेदी करू शकता. जर तुम्हाला हा फोन आणखी स्वस्तात ऑर्डर करायचा असेल तर तुम्हाला काही काळ थांबावे लागेल कारण काही आठवड्यांनंतर प्रजासत्ताक दिन सेल सुरू होणार आहे.     

मॅकबुकवरही सूट 

आयफोनव्यतिरिक्त मॅकबुकवर ही 20,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. MacBook Pro M2  मॉडेल (256 GB) 1,09,312 रुपयांना, तर मॅकबुक एअर एम 1 (256 जीबी)  76,918 रुपयांना मिळत आहे. याशिवाय 14 इंच डिस्प्ले असलेला  MacBook Pro M3 हा 1,54,706 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जर तुम्ही मॅकबुक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते खरेदी करण्याची वेळ उत्तम आहे. 

कॅमेरा आणि डिस्प्लेबाबत माहिती

आयफोन 15 सीरिजमध्ये 48 मेगापिक्सेल मेन कॅमेरा, 24 मेगा पिक्सेल सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 12 मेगापिक्सेल फ्रंटकॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन 15 मध्ये 6.1 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. त्याशिवास आयफोन 15 प्लसमध्ये 6.7 इंचाची डिस्पे देण्यात आला आहे. आयफोन 15 सीरिजमध्ये A16 बायोनिक चिप फिचर्स फार महत्त्वाचं आहे. यामध्ये नवीन कॅमेरा सिस्टीम देण्यात आलेली आहे. यातील नाईट मोडमध्ये नवीन अपडेट देण्यात आलं आहे. व्हिडीओच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, नवीन आयफोन 15 प्रो मध्ये यूजर्स 4K 60FPS एवढ्या हाय क्वालिटीचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकणार आहेत.

इतर महत्वाची बातमी-

मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची पार्टी, नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप

[ad_2]

Related posts