Money Transfer Tips What To Do If You Transfer Funds To The Wrong Account

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Money Transfer : अनेकदा ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना नकळत (Wrong Account) बँक खाते क्रमांक चुकीचा टाईप केला जातो. यामुळे तुमचे सर्व पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होतात. इंटरनेटचा वापर जसजसा वाढू लागला आहे, तसतसा बँकिंगशी संबंधित समस्याही वाढत आहेत. ही चूक कुणाचीही होऊ शकते, आपल्यासोबत असे घडले तर आधी काय करायचे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. यूपीआय आणि नेट बँकिंगदरम्यान चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास काय करावे हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. 48 तासांच्या आत पैसे परत कसे मिळेल? पाहुयात…

48 तासांच्या आत पैसे परत मिळवा…

जर तुम्ही चुकीच्या खात्यात पेमेंट केले असेल तर आधी तुम्हाला त्या पेमेंट प्लॅटफॉर्मच्या हेल्पलाइन नंबरवर (फोन-पे, गुगल पे, पेटीएम) कॉल करावा लागेल. जिथे तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. हे तुम्हाला त्यांना सांगावे लागेल. यानंतर तुम्हाला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) वेबसाईटवर जाऊन आपली तक्रार नोंदवावी लागेल. मग शक्य तितक्या लवकर तुम्हाला तुमच्या बँकेतही चुकीच्या पेमेंटची तक्रार दाखल करावी लागेल.

तक्रार करण्यासाठी कोणत्या क्रमांकावर फोन करावा?

यूपीआय आणि नेट बँकिंगमधून चुकीच्या अकाऊंट नंबरवर पेमेंट केल्यास आधी 18001201740 तक्रार दाखल करा. यानंतर संबंधित बँकेत जाऊन फॉर्म भरून त्याची माहिती द्यावी. बँकेने मदत करण्यास नकार दिल्यास  bankingombudsman.rbi.org.in तक्रार करावी.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ऑनलाइन पेमेंट करताना एखाद्या ग्राहकाच्या खात्याची रक्कम चुकून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केल्यास तक्रारीत हस्तक्षेप करून ती 48 तासांच्या आत परत करण्याची जबाबदारी बँकेची आहे. यूपीआय आणि नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यानंतर फोनवर आलेला मेसेज नेहमी डिलीट करू नका. या मेसेजमध्ये पीपीबीएल नंबर असतो, जो तक्रारीच्या वेळी आवश्यक असतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

तक्रार दाखल करताना चुकीच्या ट्रांसफर  अकाउंटची माहिती आपल्याकडे असावी. हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे यूपीआय आणि नेट बँकिंगनंतर फोनवर आलेले मेसेज डिलीट करू नयेत. या मेसेजमध्ये पीपीबीएल नंबर आहे. त्याचा पुरावा म्हणून वापर केला जातो. सध्या ऑनलाईन फ्रॉडदेखील समोर येतात. त्यामुळे कायम पैसे ट्रान्सफर करताना बारकाईने लक्ष देऊनच पैसे ट्रान्सफर करा.

इतर महत्वाची बातमी-

विदेशी संपत्तीनं भारताची तिजोरी भरली! महिनाभरात तिजोरीत आले 1.37 लाख कोटी; सविस्तर माहिती एका क्लिकवर

[ad_2]

Related posts