Chhagan Bhujbal Absent From Wardha OBC Sabha OBC Meeting Is Not Crowded Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वर्धा : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी वर्ध्यात आज ओबीसी मेळाव्याचा आयोजन करण्यात आले होते. मात्र, या मेळाव्यात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची गैरहजरी पाहायला मिळत आहे. भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या सभेला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या सभेला गर्दीच झाली नसल्याने भुजबळ यांनी सभेला येण्याचे टाळले असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. 

राज्यभरात ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून, आज वर्धा जिल्ह्यात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार होती. मात्र,  भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या सभेला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, डॉक्टरांशी चर्चा करून उद्या ठाणे येथील सभेला जायचं की नाही? याबाबत छगन भुजबळ निर्णय घेणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. 

सभेला गर्दी नसल्याने जाण्याचं टाळलं? 

प्रकृती ठीक नसल्याने भुजबळ यांनी वर्धा येथील सभेत जाण्याचं टाळले असल्याचा दावा केला जात असतानाच, दुसरीकडे याच वर्ध्याच्या सभेत अपेक्षित गर्दीच झाली नसल्याचे चित्र आहे. सभेच्या ठिकाणी 25 हजार ओबीसी बांधव येतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवला होता. त्यानुसार तयारी देखील करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात सभेच्या ठिकाणी 500 च्या आतच लोकं हजर असल्याचे दिसून आले. तर, या ओबीसी मेळाव्यात गर्दी नसल्यानेच भुजबळ सभेला आले नसल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. 

मोठी तयारी, पण गर्दीच नाही…

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट ओबीसी आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. हाच विरोध दर्शवण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ओबीसींची सभा आयोजित करण्यात येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते या सभेला उपस्थित रहात असल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच सभा आज वर्धात आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी झालेल्या ओबीसी सभांमधील गर्दी पाहता या सभेला देखील मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ओबीसी नेत्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात वर्ध्यातील ओबीसी बांधवांनी या सभेकडे पाठ फिरवली. जिथे 25 हजार लोकांची गर्दी होईल असा अंदाज बांधण्यात आला होता, त्याच सभेत 500 लोकांना जमवण्यासाठी नेत्यांची दमछाक पाहायला मिळाली. त्यामुळे, आता उद्या होणाऱ्या ठाण्यातील सभेला देखील गर्दी होणार की नाही? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! ओबीसी सभेकडे लोकांनी पाठ फिरवली, गर्दीच नसल्याने 90 टक्के खुर्च्या खाली

[ad_2]

Related posts