Dada Bhuse On Sudhakar Badgujar Salim Kutta Inquiry Will Come Hidden Thimgs About Sanjay Raut Uddhav Thackeray Maharashtra Politics 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक: सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या चौकशीनंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील, बडगुजर हा छोटा मासा आहे, बात निकली है तो बहोत दूर तक जायेगी असं म्हणत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे. ललित पाटील ड्रॅग्स प्रकरणात अणु रेणू इतकाही संबंध आल्यास पद आणि राजकारण दोन्हीही सोडून देईल असंही ते म्हणाले.

काय म्हणाले दादा भुसे?

मुंबई बॉम्ब स्फोटाचा सूत्रधार सलीम कुट्टा या देशद्रोह्यासोबत नाशिक शिवसेना ऊबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी बडगुजर फॉर्मवर पार्टी दिल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. तिथे नाचगाणे देखील झाल्याचं दिसून आलं. यामध्ये काही क्रिमिनल देखील सहभागी होते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सुधाकर बडगुजरांना सगळ्या गोष्टींची आठवण होईल. बडगुजर यांच्या चौकशीची मागणी आ.नितेश राणे यांनी केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी महाराष्ट्राच्या समोर येतील. मैं हू डॉन वर बडगुजर हे अनेक क्रिमिनल आणि देशद्रोह्यांसोबत थिरकले याचा संपूर्ण भारतीयांना राग आहे. बडगुजर हा छोटा मासा आहे. बात निकली है तो बहोत दूर तक जायेगी. 

दरम्यान, बडगुजर यांनी भुसे यांचेवर केलेल्या ड्रग्स प्रकरण आरोपांचेही मंत्री भुसे यांनी उत्तर दिले. ललित ड्रग्स प्रकरण हे 2020 चे आहे. सुधाकर बडगुजर यांनीच त्याचा शिवसेना प्रवेश घडवून आणला होता. या प्रकरणात माझा अणु -रेणु इतकाही संबंध निघाला तरी पद आणि राजकारण सोडून देईन अशी प्रतिक्रिया नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षाचे सुधाकर बडगुजरांचा सलीम कुट्टा (Salim Kutta) याच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ दाखवला आणि एकच चर्चा सुरू झाली. सलीम कुट्टा उर्फ मोहम्मद सलीम मीरा शेख, ज्याला 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सलीम मीरा शेख उर्फ ​​सलीम कुट्टा हा सध्या पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

ही बातमी वाचा :

 

[ad_2]

Related posts