Sri Lanka Parliamentary Delegation Visited Ajanta Caves In Chhatrapati Sambhaji Nagar Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : श्रीलंका (Sri Lanka) देशाचे संसदीय शिष्टमंडळ आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील अजिंठा लेण्यांची (Ajanta Caves) भेट देण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे कालच (शनिवार 16 डिसेंबर) रोजी हे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दाखल झाले होते. या शिष्टमंडळात एकूण 20 जण असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. आज सायंकाळी विमानाने हे शिष्टमंडळ नवी दिल्लीकडे रवाना होणार आहे. 

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असतात. दरम्यान, आज श्रीलंका देशाचे संसदीय शिष्टमंडळाने अजिंठा लेणीला भेट दिली. यावेळी त्यांनी लेणी पाहून आश्चर्य व्यक्त केले. तसेच या लेण्यांच्या कोरीव कामाचे कौतुक देखील केले. यापूर्वी देखील वेगवेगळ्या देशातील महत्वाच्या नेत्यांनी अजिंठा आणि वेरूळ लेणीला भेट दिली आहे. 

शिष्टमंडळात यांचा समावेश… 

या शिष्टमंडळात श्रीलंकाच्या संसदीय शिष्टमंडळाचे नेते तथा श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्देना, त्यांची पत्नी सुश्री नेलुम ललना यापा अबेवर्धना, मुख्य व्हीप प्रसन्न रणतुंगा, खासदार जीवन ठोंडमन,  उपसभापतीअजित राजपक्षे,  समितीचे उपाध्यक्ष अंगजन रामनाथन,खासदार निरोशन परेरा,  वीरसुमना वीरासिंघे, मो.मुझम्मील, उदयकुमार, वरुणा प्रियंथा लियानागे, जगथ समरविक्रम, एम. रामेश्वरन,महासचिव सौ. कुशाणी अनुषा रोहनाडीरा, उपसचिव चामिंडा कुलरत्ने, सहाय्यक संचालक प्रशासन जयलथ परेरा, डॉ.चमीरा यापा अबेवर्देना, जिनलाल चुंग, उपसचिव मुकेश कुमार, एल्डोस मॅथ्यू पुन्नूज, कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी यांचा समावेश होता. 

शिष्टमंडळासोबत स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती 

या शिष्टमंडळा सोबत महाराष्ट्र राज्य विधानमंडळ उपसचिव उमेश शिंदे, कक्ष अधिकारी विनोद राठोड छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासतील राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, सोयगाव तहसीलदार मोहनलाल हरणे, तसेच संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती. या शिष्टमंडळाचे शहरात कालच आगमन झाले होते. आज सकाळी हे शिष्टमंडळ अजिंठा लेण्याची पाहणी करण्यासाठी अजिंठा येथे आले होते.

अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात… 

अजिंठा लेणी पाहण्यासाठी नेहमीच गर्दी असते. देश-विदेशातील पर्यटक ही लेणी पाहण्यासाठी शहरात येत असतात.  सोयगाव तालुक्यात असलेल्या अजिंठा लेणीत एकूण 29 बौद्ध लेणी आहेत. विशेष म्हणजे डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या गेलेल्या चित्रातून बुद्धांच्या जीवनावर आधारित जातक कथा पाहायला मिळतात. त्यामुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात.

इतर महत्वाच्या बातम्या:  

PHOTO: जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणारी औरंगाबाद शहरातील 10 पर्यटन स्थळे

[ad_2]

Related posts