Nathan Lyon Becomes Just The 4th Spinner To Pick 500 Test Wickets

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nathan Lyon : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये 500 कसोटी बळी घेणारा लियॉन हा जगातील 8वा आणि ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या घरच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने हा विक्रम केला. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पर्थच्या मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात फहीम अश्रफची विकेट ही नॅथन लायनच्या कसोटी कारकिर्दीतील 500वी विकेट होती.

अॅशेस मालिकेत 496 विकेट्स 

यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या अॅशेस मालिकेदरम्यान दुखापत होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्यान नॅथन लायनने 496 कसोटी बळी पूर्ण केले होते. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 3 विकेट घेतल्या, त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या एकूण बळींची संख्या 499 झाली. या सामन्याच्या दुसऱ्या डावात पहिली विकेट घेतल्यानंतर, नॅथन लियॉनने 500 कसोटी बळी घेणार्‍या जगातील महान गोलंदाजांच्या यादीत समावेश केला. 500 कसोटी बळी घेणारा तो ऑस्ट्रेलियाकडून तिसरा गोलंदाज ठरला आहे.

जगातील 8 गोलंदाज ज्यांनी 500 कसोटी बळी 

जागतिक क्रिकेटमध्ये 500 बळी घेणार्‍या सर्व गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनचे (एकूण 800 विकेट्स) नाव प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर शेन वॉर्न (एकूण 708 बळी), इंग्लंडचा जेम्स अँडरसन (एकूण 690 बळी), भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळे (एकूण 619 बळी), इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (एकूण 604 बळी), ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा (एकूण 604 बळी) यांचा क्रमांक लागतो. 

नॅथन लायनची कसोटी कारकिर्द

नॅथन लायनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 123 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 230 डावांमध्ये 30.86 च्या सरासरीने आणि 2.93 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 501 बळी घेतले आहेत. सर्वोत्तम गोलंदाजी 50 धावांत 8 बळी अशी आहे.  लियॉनने आतापर्यंतच्या कारकिर्दीत 22 वेळा 4 विकेट आणि 23 वेळा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

अश्विन सुद्धा पराक्रम करण्याच्या तयारीत

नॅथन लायनच्या मागे भारताच्या रविचंद्रन अश्विनचे ​​नाव आहे, ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 489 विकेट्स घेतल्या आहेत आणि 11 विकेट्स घेऊन तो जगातील नववा आणि भारताकडून दुसरा गोलंदाज ठरला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या



[ad_2]

Related posts