Google Maps Fuel Saving Feature How To Save Fuel While Driving Check Tips And Tricks

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Google Maps :  जर तुम्हीही पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किंमतींमुळे (Google Maps) चिंतेत असाल तर आता गुगलने तुमच्यासाठी एक उत्तम फिचर आणले आहे. तुम्हीही आतापर्यंत नेव्हिगेशनसाठी गुगल मॅप्सचा वापर केला असेल, पण आता तुमच्या सोयीसाठी गुगल मॅप्समध्ये आणखी एक नवीन फीचर जोडले जाणार आहे, या नव्या फीचरचे नाव आहे फ्यूल सेव्हिंग फीचर. स्वत:च्या वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी गुगल मॅप्सचे इंधन बचत ीचे फिचर सर्वात उपयोगाचं ठरणार आहे. हे फिचर आतापर्यंत मोजक्याच देशांमध्ये उपलब्ध होते आणि आता लवकरच भारतीय युजर्ससाठी हे फिचर अॅपमध्ये अॅड करण्यात येणार आहे.

गुगल मॅप्सच्या इंधन बचत फीचरमुळे आपण ज्या मार्गावर जात आहात त्या मार्गावर आपण किती इंधन खर्च करणार आहात याची कल्पना येते. त्या मार्गावरील सध्याची रहदारी आणि रस्त्यांची परिस्थिती पाहून इंधन अंदाज देते.  नाहीतर तुम्हाला दुसरा मार्ग दाखवते ज्यामुळे इंधनाची बचत होण्यास मदत होईल. गुगल मॅप्स आपलं काम करेल, पण तुम्ही कोणत्या मार्गाने जाणे पसंत करता हे तुमच्यावर अवलंबून असेल.

गुगल मॅप्स फ्यूल सेव्हिंग फीचर कसे चालू करावे?

-सर्वप्रथम फोनमध्ये गुगल मॅप ओपन करा, त्यानंतर तुमच्या प्रोफाईल पिक्चर किंवा अॅपमध्ये दिसणाऱ्या सुरुवातीच्या (तुमच्या नावाचं आणि आडनावाचं पहिलं अक्षर) टॅप करा.
-यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन नेव्हिगेशन ऑप्शनवर टॅप करा.
-नेव्हिगेशन ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रूट ऑप्शनवर जावे लागेल, त्यानंतर  Prefer fuel-efficient routes वर टॅप करा आणि हे फीचर ऑन करा.
-यानंतर इंजिन प्रकारावर क्लिक करून दिलेल्या पर्यायांमधून निवड करावी लागेल.

अॅप 2008 मध्ये लाँच झालं

Google Maps वर अनेक वर्ष काम केले गेले आणि नंतर नोव्हेंबर 2007 मध्ये Google ने Google Maps सगळ्यांसाठी सादर केले. गुगल मॅपची सुविधा मोबाईलमध्ये देण्यात आली. आज गुगल मॅपच्या मदतीने अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅप फार उपयोगी पडतो. गुगल मॅपचे पहिले अँड्रॉइड अॅप 2008 मध्ये लाँच झाले होते आणि त्यानंतर 2012 मध्ये iOS अॅप लाँच करण्यात आले होते. आज तुम्ही गुगल मॅपवर संपूर्ण जगाचे रस्ते आणि मार्ग सहज पाहू शकता. गुगल मॅप तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो आणि तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळदेखील दाखवतो. यामुळे अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Free Gmail Storage : ना पैसे, ना टेन्शन; ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरुन Gmail Storage वाढवा!

 

[ad_2]

Related posts