[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. दाऊदला पाकिस्तानमध्ये विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर दाऊदला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत कुठली अधिकृत माहिती आली नाही.
पाकिस्तानातील अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दाऊदला विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे, मात्र आतापर्यंत या वृत्ताला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तसेच त्याला कोणी विष प्राशन केले याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
दाऊदला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे की नाही याची पुष्टी कोणीही करू शकलेले नाही. अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यामागे विष हे कारण असावे असा अंदाज आहे.
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि डी-कंपनीचा प्रमुख दाऊद इब्राहिम भारतातून फरार आहे. तो 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात 250 हून अधिक लोकांचा जीव गेला आणि हजारो जखमी झाले. त्यानंतरच त्याला भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित करण्यात आले. तेव्हापासून त्याने पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. याचे पुरावेही भारताने अनेकदा सादर केले आहेत. मात्र, पाकिस्तान सातत्याने त्याची उपस्थिती नाकारत आहे.
14 वर्षांपूर्वी, 26 नोव्हेंबर 2008 रोजी, लष्कर-ए-तैयबाच्या दहा प्रशिक्षित आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रसज्ज दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांवर आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता, जो चार दिवस सुरू होता. मुंबई हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले होते.
भारत सरकारच्या तपास यंत्रणेने या हल्ल्यामागे माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा हात असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानात बसून दाऊद इब्राहिमने मुंबईत आपल्या टोळ्यांमार्फत पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांना शस्त्रे आणि दारूगोळा पुरवला होता. त्यानंतर भारत सरकारने दाऊद इब्राहिमला भारतासाठी मोस्ट वाँटेड दहशतवादी यादीत टाकले होते.
भारतीय सुरक्षा यंत्रणा अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत होती. भारतीय सुरक्षा एजन्सीनेही अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर दाऊद इब्राहिमच्या कराचीत लपल्याचे पुरावे दिले, परंतु पाकिस्तान सरकारने ते नाकारले.
[ad_2]