Pune Woman Molested By 70 Year Old Man Forcibly Kissed In Office Despite Refusal Harrasment Case Maharashtra News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे: पुण्यात एका 70 वर्षाच्या नागरिकाकडून महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी महिला नकार देत असतानाही तिला जबरदस्तीने जवळ घेत चुंबन (Pune 70 year old man forcibly kissed woman) घेतल्याची घटना घडली आहे. राजीव विनायक विळेकर असं या व्यक्तीचं नाव असून याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक नकारात्मक बाबी येत पुण्यातील या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. कामावर असतानाच  सहकारी महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून 70 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीकडून हे कृत्य घडलं आहे.

ऑफिसमध्येच जबरदस्तीने चुंबन (Pune Woman Molestation Case)

पुण्यातील घोले रस्त्यावरील महात्मा फुले वस्तू संग्रहालयातील सहकारी महिलेचा या वृद्ध व्यक्तीकडून विनयभंग करण्यात आला. ऑफिसमध्ये काम करत असतानाच सहकारी महिलेकडे 70 वर्षीय व्यक्तीने चुंबनाची मागणी केली. त्यानंतर ही महिला नकार देत असताना आरोपीने महिलेला जबरदस्तीने जवळ घेत चुंबन घेतलं. 

 

 

[ad_2]

Related posts