Nashik News Other Religion Crowd Enters Forcefully In Trimbakeshwar Temple Of Nashik Video Reveals

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Trimbakeshwer Mandir: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिरात इतरधर्मियांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानं तणाव निर्माण झाला होता, उरूसच्या दरम्यान काही तरुण देवाला धूप दाखविण्यासाठी मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी आग्रही होते, मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांनी मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला, त्यामुळे वाद निर्माण झाला होता. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, विशेष म्हणजे या व्हिडीओचा आवाज बंद (म्युट) करण्यात आला असून संभाषण ऐकू येत नाही. दोन दिवस उशिराने हे व्हिडीओ का व्हायरल करण्यात आले? त्याचा आवाज का बंद झाला? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

नाशिकमधील (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात 2 दिवसांपुर्वी काही अन्यधर्मीयांनी बळजबरीने शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केला होता. इतर धर्मीय मंदिरात दर्शनासाठी जात असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. इतर धर्मीय  हार-फुलं घेऊन दर्शनासाठी जात असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. दोन दिवसांपुर्वी उत्तर दरवाजाच्या ठिकाणी हा जमाव आला होता, त्यावेळी त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. देवस्थान प्रशासनाकडून त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला होता आणि त्यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं होतं.   

दोन दिवसांनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, याआधीच संबंधित प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. उरुस आयोजकांनी सांगितलं की, दरवर्षी आम्ही अशा प्रकारची मिरवणूक काढतो आणि देवाला धूप दाखवतो आणि तिथून पुढे आमची मिरवणूक मार्गस्थ होते. मागच्या वर्षीही त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी वाद झाला नव्हता, याच वेळी वाद का निर्माण होतोय? हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होत आहे. 

दुसरी बाब म्हणजे, जर अशा स्वरुपाचा व्हिडीओ व्हायरल करायचा होता, तर दोन दिवस हा व्हिडीओ व्हायरल का झाला नाही? तक्रार झाली आणि तणाव निर्माण झाला, त्यानंतरच हा व्हिडीओ का व्हायरल होत आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
 
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला आवाजच नाही. हा आवाज का काढण्यात (Mute) आला, त्यामुळे काय संभाषण झालं होतं हे कळत नाही आणि अनेक शंका यातून उपस्थित होत आहेत. त्यामुळे, पोलिसांकडून ओरिजिनल व्हिडीओ पाहिला जात आहे आणि त्यातून काय संभाषण झालं होतं याची माहिती घेतली जाईल. त्यासोबतच, सीसीटीव्ही फुटेजमधून माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा:

मोठी बातमी! कालीचरण महाराज यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल, समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप

[ad_2]

Related posts