IPL 2023 GT Qualified For Playoffs Winning Against SRH Get To Know Their Journey So Far This Edition 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

GT In IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात क्वालिफाय होणारा गुजरात पहिला संघ आहे. गतविजेत्या गुजरातने 13 सामन्यात 9 विजय मिळवले आहेत. 18 गुणांसह गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. उर्वरित सामन्याचा विचार केल्यास 18 गुणांपर्यंत फक्त मुंबईचा संघ मजल मारु शकतो.. त्यामुळे गुजरातचा संघ क्वालिफायर एक सामना खेळणार हे आता जवळपास निश्चित झालेय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने यंदा दमदार कामगिरी केली आहे. गुजरातने 13 सामन्यात नऊ विजय मिळवलेत तर चार पराभवाचा सामना केलाय.  हैदराबादचा पराभव करत गुजरातने क्वालिफाय केलेय. 

यंदाच्या हंगामातील गुजरातची कामगिरी कशी राहिली… 13 सामन्यात काय काय झाले ?

31 मार्च 2023 – आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामन्याने झाली होती. पहिल्याच सामन्यात गुजरातने विजय मिळत सुरुवात दणक्यात केली. गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. 

4 एप्रिल 2023 – गुजरातने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. 

9 एप्रिल 2023 – कोलकात्याने गुजरातचा तीन विकेटने पराभव केला. याच सामन्यात रिंकू सिंह याने गुजरातच्या यश दयाल याला लागोपाठ पाच षटकार लगावत सामना जिंकून दिला होता. गुजरातचा हा यंदाच्या हंगामातील पहिला पराभव होता. 

13 एप्रिल 2023 – गुजरातने पंजाबचा सहा विकेटने पराभव केला. 

16 एप्रिल 2023 – राजस्थानने गुजरातचा तीन विकेटने पराभव केला. 

22 एप्रिल 2023 – गुजरताचा लखनौवर सात धावांनी विजय.. रोमांचक सामन्यात गुजरातने बाजी मारली.

25 एप्रिल 2023 – गुजरातचा मुंबईवर 55 धावांनी विजय 

29 एप्रिल 2023 – गुजरातने पराभवाचा वचपा काढला.. कोलकात्याला गुजरताने सात विकेटने पराभूत केले. 

2 मे 2023 – दिल्लीने गुजरातला पाच धावांनी हरवले. 

5 मे 2023 – गुजरातने राजस्थानचा दारुण पराभव ेकला. गुजरातने राजस्थानवर नऊ विकेटने विजय मिळवला. 

7 मे 2023 – गुजरातने लखनौचा 56 धावांनी पराभव केला. 

12  मे 2023 – मुंबईने वानखेडेवर गुजरातचा 27 धावांनी पराभव केला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने शतकी केळी केली. तर गुजरातकडून राशिद खान याने अष्टपैलू खेळी केली. गोलंदाजीत चार विकेट घेतल्या तर फलंदाजी अर्धशतक झळकावले. 

15 मे 2023 – गुजरातने हैदराबादचा पराभव केला. शुभमन गिल याच्या शतकी खेळीच्या बळावर गुजरातने 188 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर शमी आणि शर्माच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. हैदराबादकडून क्लासेन याने अर्धशतक झळकावले. तर गोलंदाजीवेळी भुवनेश्वर कुमार याने पाच विकेट घेतल्या. 

शेवट विजयाने करणार ?

21 मे 2023 –  गुजरात आणि आरसीबी यांच्यात लीग फेरीतील अखेरचा सामना असेल. आरसीबीच्या संघासाटी हा सामना करो अथवा मरो असा असेल.. तर गुजरात विजय मिळवत आघाडीच्या दोन क्रमांकावर पोहचण्याचा प्रयत्न करेल. हा सामना आरसीबीच्या घरच्या मैदानावर होत आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असेल. 

[ad_2]

Related posts