IPL Auction 2024 Live Shardul Thakur New Zealand Allrounder Rachin Ravindra In Dhoni Csk

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL Auction 2024 Live :  धोनीच्या चेन्नई संघाने आज अष्टपैलू खेळाडूंची खरेदी केली. चेन्नईने मुंबईच्या शार्दूल ठाकूर आणि न्यूझीलंडच्या रचिन रविंद्र याला आपल्या ताफ्यात घेतले. शार्दूल ठाकूर याच्यासाठी चार कोटी रुपये खर्च केले तर रचिन रविंद्र याला एक कोटी 80 लाख रुपयात ताफ्यात घेतले. रचिन रविंद्र टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करु शकतो. त्याशिवाय गोलंदाजीही करु शकतो. शार्दूल ठाकूर याआधीही चेन्नईचा भाग राहिलाय. 

IPL Auction 2024 Live : अष्टपैलू शार्दूल ठाकूर चेन्नईच्या ताफ्यात
शार्दूल ठाकूर याच्यासाठी चेन्नई आणि हैदाराबाद संघामध्ये चूरस सुरु होती. पण अखेर चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने शार्दूल ठाकूर याला चार कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतलेय. याआधीही शार्दूल चेन्नईचा सदस्य होता. गतवर्षी तो कोलकात्याच्या संघात होता. त्याला यंदा चेन्नईने आपल्या ताफ्यात घेतलेय. 

शार्दूलचं आयपीएल करियर –
शार्दूल ठाकूर याने 86 आयपीएल सामन्यात आतापर्यंत प्रतिनिधित्व केलेय. यामधील 34 डावात तो फलंदाजीला आलाय. त्यामध्ये त्याने 286 धावा केल्या आहेत. 140 च्या स्ट्राईक रेटने त्याने गोलंदाजांची पिटाई केली. त्याची सर्वोच्च धावसंख्या 68 इतकी आहे. त्याने आतापर्यंत 12 षटकार आणि 25 चौकार ठोकले आहेत. तळाला फटकेबाजी करण्यात शार्दूल पटाईत आहे. गोलंदाजीत शार्दूल ठाकूर याने आतापर्यंत 89 विकेट घेतल्या आहेत. चार विकेट एकवेळा घेण्याचा पराक्रम त्याने केलाय. 

IPL Auction 2024 Live : रचिन रविंद्र चेन्नईच्या ताफ्यात
रचिन रविंद्र साठी सर्वात आधी चेन्नई संघाने बोली लावली. त्यानंतर दिल्ली संघानेही रस दाखवला. दिल्ली आणि चेन्नई यांच्यामध्ये रचिन रविंद्रसाठी चूरस पाहायला मिळाली. त्यानंतर पंजाबनेही यामध्ये उडी घेतली. पण अखेर चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने एक कोटी 80 लाख रुपयांत रचिन रविंद्र याला खरेदी केले. 

रचिन रविंद्र याने विश्वचषकात प्रभावी फलंदाजी केली होती. त्याशिवाय तो गोलंदाजीतही योगदान देतो. पदार्पणातच रचिन रविंद्र याने विश्वचषकात धावांचा पाऊस पाडला होता. भारतीय खेळपट्टीवर तो प्रभावी ठरत असल्याचे विश्वचषकात दिसले.

रचिन रविंद्रचं टी 20 करियर –
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र याने आतापर्यंत 16 टी 20 सामन्यात 145 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 117 इतका आहे. त्याला अद्याप एकही अर्धशतक ठोकता आले नाही. त्याने 12 चौकार आणि चार षटकार ठोकले आहेत.  रचिन रविंद्र याने गोलंदाजीत 11 विकेटही घेतल्या आहेत. रचिन रविंद्र याची सर्वोच्च गोलंदाजी 22 धावा देऊन तीन विकेट आहे.



[ad_2]

Related posts