Ipl Auction 2024 New Zealand Daryl Mitchell Bought By Chennai Super Kings At 14 Crore Rupees While Base Price Were 1 Crore

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Daryl Mitchell : चेन्नईने न्यूझीलंडच्या अष्टपैलू डॅरेल मिचेल याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मिचेल याला मूळ किंमतीच्या 14 पट अधिक रक्कम देत ताफ्यात घेतलेय. डॅरेल मिचेल याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. मिचेल याला चेन्नईने 14 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. आता डॅरेल मिचेल, डेवॉन कॉनवे, रचिन रविंद्र आणि मिचेल सँटनर असे चार न्यूझीलंडचे खेळाडू चेन्नईच्या ताफ्यात असतील.

डॅरेल मिचेल याला धोनीच्या चेन्नईने आपल्या ताफ्यात घेतलेय. त्याच्यासाठी चेन्नईने 14 कोटी रुपये खर्च केले. न्यूझीलंडच्या अष्टपैलू डॅरेल मिचेलसाठी दिल्ली आणि पंजाब यांच्यामध्ये लढत झाली. दोन्ही संघाने अष्टपैलू खेळाडूवर भर दिलाय. दिल्लीला मधल्या षटकात भरवशाचा फलंदाज हवा होता, त्यासाठी त्यांनी डॅरेल मिचेलवर बोली लावली.  11 कोटींपेक्षा पुढे बोली गेल्यानंतर दिल्लीने माघार घेतली, पण त्यावेळी चेन्नईने यामध्ये उडी घेतली.  चेन्नईने अखेर 14 कोटी रुपयांमध्ये डॅरेल मिचेल याला ताफ्यात घेतले. डॅरेल मिचेल, डेवॉन कॉनवे, रचिन रविंद्र आणि मिचेल सँटनर असे चार न्यूझीलंडचे खेळाडू चेन्नईच्या ताफ्यात असतील. 

अष्टपैलू शार्दूल ठाकूर चेन्नईच्या ताफ्यात
शार्दूल ठाकूर याच्यासाठी चेन्नई आणि हैदाराबाद संघामध्ये चूरस सुरु होती. पण अखेर चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने शार्दूल ठाकूर याला चार कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतलेय. याआधीही शार्दूल चेन्नईचा सदस्य होता. गतवर्षी तो कोलकात्याच्या संघात होता. त्याला यंदा चेन्नईने आपल्या ताफ्यात घेतलेय. 

रचिन रविंद्रवरही चेन्नईने खेळला डाव –
रचिन रविंद्र साठी सर्वात आधी चेन्नई संघाने बोली लावली. त्यानंतर दिल्ली संघानेही रस दाखवला. दिल्ली आणि चेन्नई यांच्यामध्ये रचिन रविंद्रसाठी चूरस पाहायला मिळाली. त्यानंतर पंजाबनेही यामध्ये उडी घेतली. पण अखेर चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने एक कोटी 80 लाख रुपयांत रचिन रविंद्र याला खरेदी केले. 

Chennai Super Kings Retained Players: चेन्नईच्या ताफत कोण कोण?

अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, शार्दूल ठाकूर, रचिन रविंद्र, डॅरेल मिचेल

Chennai Super KingsRetained Players: Ajay Mandal, Ajinkya Rahane, Deepak Chahar, Devon Conway, Maheesh Theekshana, Matheesha Pathirana, Mitchell Santner, Moeen Ali, MS Dhoni, Mukesh Choudhary, Nishant Sindhu, Prashant Solanki, Rajvardhan Hangargekar, Ravindra Jadeja, Ruturaj Gaikwad, Shaik Rasheed, Shivam Dube, Simarjeet Singh, Tushar Deshpande 
 



[ad_2]

Related posts