IPL Auction 2024 Sameer Rizvi Goes To CSK For 8.40 Crore Who Is Sameer Rizvi Know Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : समीर रिझवी (Sameer Rizvi) हा भारताचा देशांतर्गत सामने खेळणारा अनकॅप्ड खेळाडू आहे. आयपीएल 2024च्या ऑक्शनमध्ये (IPL 2024 Auction) त्याच्यावर चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघाने 8 कोटींची बोली लावली आणि संघात सामील करुन घेतलं. यावेळी चेन्नई आणि गुजरातच्या संघामध्ये जोरदार बिडींग झालं. पण यामध्ये चेन्नईने बाजी मारत त्याला आपल्या संघात सामील करुन घेतलं. उत्तर प्रदेशाच्या या खेळाडवर चेन्नईने 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावली. 

रिझवीवर बोली लावण्यात चेन्नई आणि गुजरात अव्वल होते, त्यानंतर दिल्लीने देखील त्यांच्यात सहभाग घेतला. त्यानंतर दिल्लीने त्याच्यावर 7 कोटी 60 लाख रुपयांची बोली लावली. पण त्यांनाही मागे सारत चेन्नईने 8 कोटी 40 लाख रुपये देत समीर रिझवीला आपल्या संघात सामील करुन घेतले. 

समीर रिझवी कोण? 

20 वर्षीय समीर रिझवी हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याने UP T20 लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्ससाठी सर्वाधिक षटकार ठोकले. त्यामध्ये दोन धडाकेबाज शतकांचाही समावेश आहे. तसेच त्याने याच स्पर्धेत नऊ डावात 455 धावा केल्या आहेत.  यामुळे त्याला पंजाब किंग्जसह तीन फ्रँचायझींमध्ये चाचपण्यात आले. त्याचा एक भाग त्याचे प्रशिक्षक सुनील जोशी देखील होते. यूपीच्या 23 वर्षांखालील संघामध्ये असल्यामुळे रिझवीला फ्रँचायझी चाचण्यांना मुकावे लागले. 

त्यानंतर त्याने पण 23 वर्षांखालील संघासोबतच्या त्याच्या पहिल्या खेळात त्याने राजस्थानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 65 चेंडूंत 91 धावा केल्या.त्यामुळे उत्तर प्रदेशला टूर्नामेंट जिंकण्यास मदत झाली. रिझवीने अंतिम सामन्यात 50 चेंडूत 84 धावा ठोकल्या. त्याने ही स्पर्धा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून पूर्ण केली. त्यानंतर आता आयपीएल 2024 साठी सर्वात जास्त अनकॅप्ड खेळाडूंपैकी असलेल्या रिझवीवर 8 कोटी 40 लाखांची बोली लागली. 

यंदाच्या लिलावात 23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी

यंदाच्या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.

मिचेल स्टार्कवर सर्वाधिक बोली

मिचेल स्टार्कसाठी चार संघामध्ये बिडिंग टेबलवर लढत झाली.  मिचेल स्टार्कसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन संघामध्ये आधी लढत झाली. 10 कोटींपर्यंत बोली पोहचल्यानंतर दिल्लीने माघार घेतली. त्यानंतर कोलकात्याने रस दाखवला. मुंबईने माघार घेतली. पण त्याचवेळी गुजरातनेही रस दाखवला. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये स्टार्कसाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकात्याने स्टार्कला ताफ्यात घेतले. कोलकात्याने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले. 

हेही वाचा : 

IPL Auction 2024 : मिचेल स्टार्क IPL हंगामातील आतापर्यंतचा सर्वात महाग खेळाडू, सॅम करन, कॅमरुन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांचा रेकॉर्ड काढला मोडीत

[ad_2]

Related posts