Dr Hanmant Dharmakare Murder Case And Pistol Sale Mastermind Finally Jailed After 2 Years

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yavatmal Crime : यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातील उमरखेड येथे घडलेल्या बहुचर्चित डॉ. हनमंत धर्मकारे यांच्या हत्या प्रकरणापासून (Dr. Hanmant Dharmakare Murder Case) फरार असलेला आरोपीला अखेर दोन वर्षांनंतर जेरबंद करण्यात यवतमाळ पोलिसांना (Crime News) यश आले आहे.  ही कारवाई मोठ्या शिताफीने सापळा रचत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमरखेड ते हातगावकडे जाणाऱ्या रोडवर केली. अमजद खान सरदार खान (वय 32, रा. अरुण नाईक ले-आउट, पुसद), असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात आरोपीचे नाव आहे. 

दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा 

11 जानेवारी 2023 ला डॉ. हनुमंत धर्मकारे हे रुग्णालयात ड्युटीवर असताना एका उमरखेडमधील अपघातग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर योग्य उपचार झाले नाही आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. ही सल मनात ठेऊन त्याचा वचपा काढण्यासाठी  डॉ. हनुमंत धर्मकारेवर गोळीबार करण्यात आला होता. या खून प्रकरणाने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागाने 5 पथक तयार केले होते. या प्रकरणाचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होते. या थरारक घटनेपासून फरार असलेल्या शेख ऐफाज शेख आबरार उर्फ अपू या मुख्य आरोपीला 24 दिवसांनंतर 4 फेब्रुवारीला मध्यप्रदेशातील धार येथून अटक करण्यात आली होती. मात्र डॉ. धर्मकारे यांचा खून करण्यासाठी देशीकट्टा उपलब्ध करून देणारा अमजद खान हा फरारच होता. त्यानंतर हा आरोपी फरार असतानाही 2023 मध्ये पुसद शहराच्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला त्याने केला होता. त्यामुळे संपूर्ण यवतमाळ शहरात या आरोपीची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर सलग जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यात देशीकट्ट्याचा वापर वाढत असल्याने अमजदचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पथकाला दिले.  या आरोपीने मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत पळ काढला होता. 

फिल्मीस्टाईल थरार; अखेर देशीकट्टासह मास्टरमाईंडला बेड्या!

कुख्यात अमजद खान याचा शोध घेत असताना तो उमरखेड शहरात आला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत त्याचा पाठलाग सुरू केला. या आरोपीकडे देशीकट्टा असल्याची माहिती पोलिसांनी आधीच मिळाली असल्याने पोलिसांनी योग्य डाव साधत त्यावर कारवाई केली. मात्र उमरखेड ते हातगावकडे जाणाऱ्या रोडवरील पेट्रोल पंपाजवळ तो उभा असताना पोलीस दिसताच त्याने पळ काढला. आरोपीकडे देशीकट्टा असताना पोलिसांनी जिवाची पर्वा न करता त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. या आरोपीकडे अंगझडतीत एक लोखंडी देशी बनावटीची पिस्टल आणि मॅग्झीन सापडून आली. त्यात दोन जिवंत काडतूसदेखील होते. त्याच्याकडून देशी पिस्टल, जिवंत काडतूस, दोन मोबाईल, असा एकूण 54 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts