This 2 Rajyog will brighten the fate of 4 zodiac signs Chances of getting lots of benefits

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajyog 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. या दरम्यान एका राशीत 2 ग्रह येण्याने ग्रहांचा संयोग आणि राजयोग तयार होणार आहे. यावेळी 12 राशींवर, मानवी जीवनावर तसंच पृथ्वीवर दिसून येतो. राजकुमार बुध ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे. 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे, अशा स्थितीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, आठव्या घराचा स्वामी सहाव्या किंवा बाराव्या भावात गेल्यावर विपरित राजयोग तयार होतो. धनु राशीच्या आठव्या घरामध्ये विपरित राजयोग देखील तयार होणार आहे. हा राजयोग 3 राशींसाठी शुभ सिद्ध होणार आहे. त्यामुळे विपरीत आणि बुधादित्य राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

विपरीत राजयोग असलेल्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळू शकते. बुधादित्य राजयोगाने योजना यशस्वी होऊ शकतात. उत्पन्नात मोठी वाढ होईल. 

धनु रास

तुम्हाला सूर्य आणि बुधाचा आशीर्वाद मिळणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. विवाहित लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुंदर होईल. राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. 

कन्या रास

बुधादित्य राजयोग बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे तयार झालेला भाग्यवान ठरू शकतो. आयात-निर्यातीत गुंतलेले व्यापारी चांगला नफा कमवू शकतात. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. मालमत्तेशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. नोकरदारांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. 

तूळ रास

दोन्ही राजयोगांमुळे तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. विपरित राजयोग देखील शुभ सिद्ध होऊ शकतो. करिअरसाठी काळ अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांसाठी काळ अनुकूल राहील. पदोन्नती आणि पगार वाढण्याची दाट शक्यता आहे.रखडलेल्या कामांनाही गती मिळेल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts