African Parrot I Gave You As Gift Give Me Back Divorce Judgment Stayed For Custody Of Bird Know More Details Pune Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune News: पुणे : पती पत्नीच्या भांडणातून घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना आपण अनेकदा ऐकल्यात. घटस्फोटावेळी (Divorce) पती-पत्नींमध्ये काही गोष्टींची देवाण-घेवाण होते. अनेकदा पतीला पत्नीला पोटगी द्यावी लागते. मात्र, पुण्यातील (Pune News Updates) एका घटस्फोटानं सर्वांनाच अचंबित केलं आहे. अनेक घटस्फोटांमध्ये पत्नी मोठी पोटगी (Alimony) मागते किंवा मुलांच्या कस्टडीमुळे रखडतात. मात्र, हा घटस्फोट एका पोपटामुळे रखडला. बरं, आफ्रिकन पोपट परत दिला तरंच तुला घटस्फोट देईन, अशी अजब मागणी पतीनं पत्नीकडे केली आहे. घटस्फोटाच्या प्रकरणात पती आणि पत्नी या दोघांनीही पोटगी, स्त्रीधन, स्थावर, जंगम मालमत्तेवरील हक्क सोडले, पण त्यांचा जीव एका पोपटात अडकला. 

पुण्यातील एका पतीनं घटस्फोट मिळवण्यासाठी थेट पत्नीला भेट म्हणून दिलेला पोपट परत देण्याची अट घातली आहे. घटस्फोटासाठी अर्ज केलेलं हे जोडपं सध्या आफ्रिकन पोपटामुळे चांगलंच चर्चेत आलं आहे. 2019 मध्ये पुण्यात या दोघांचा विवाह झाला होता. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून या पती-पत्नीमध्ये मतभेद झाले. सततच्या भांडणांमुळे वैतागलेल्या पती पत्नीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात दोघांनीही कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. मात्र, दोघांचाही घटस्फोट एका आफ्रिकन पोपटवरुन रखडला. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात या घटस्फोटाची सध्या वेगळी चर्चा सुरू होती. पण अखेर पत्नीनं तो आफ्रिकन पोपट परत दिला आणि घटस्फोटाचा मार्ग मोकळा झाला. 

गिफ्ट दिलेला आफ्रिकन पोपट दे, मगच घटस्फोट देईल; पतीची अजब मागणी 

मिळालेल्या माहितीनुसार, या बाबत पत्नीकडून घटस्फोट मिळवण्यासाठी पत्नीने पतीला आफ्रिकन पोपट भेट दिला होता तो आफ्रिकन पोपट परत दिल्यानंतरच मी तुला घटस्फोट देईन असं पत्नीने पतीला न्यायालयात सांगितलं. रणवीर आणि प्रणिता (दोघांची नावं बदलली आहेत) यांचा विवाह 2019 मध्ये पुण्यात झाला होता. दरम्यानच्या काळात गेल्या चार-पाच वर्षांपासून या पती-पत्नीचे मतभेद असल्यामुळे या दोघांचा संसार सुरळीत चालला नाही. याबाबत दोघांनाही पुण्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. या अर्जादरम्यान घटस्फोट जर द्यायचा असेल तर पतीनं पत्नीला पहिल्या भेटीत भेट म्हणून दिलेल्या आफ्रिकन पोपट परत दिला, तरच तुला घटस्फोट देईन, असं सांगितलं. 

सविस्तर प्रकरण जाणून घ्या… 

11 डिसेंबर 2019 रोजी पुण्यातील विवाह निबंधक कार्यालयात पुण्यातील एका जोडप्यानं लग्नगाठ बांधली. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना वैचारिक मतभेदामुळे 14 सप्टेंबर 2021 पासून वेगळे राहू लागले.  पुण्यातील एका जोडप्यानं घटस्फोट घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी त्यासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. 9 डिसेंबर 2022 रोजी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाच्या प्रकरणात पती आणि पत्नी या दोघांनीही पोटगी, स्त्रीधन, स्थावर, जंगम मालमत्तेवरील हक्क सोडले. मात्र, आफ्रिकन पोपटात दोघांचाही जीव अडकला. पती घटस्फोटावर ठाम राहिला. पत्नीनं मिळणारा पोटगीचा हक्क सोडून देत दिवाणी अथवा फौजदारी दावा दाखल न करण्याचं मान्य केलं. पोपट दिल्याशिवाय घटस्फोट देणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर पत्नीनंही पोपट देण्यास संमती दिली. त्यानंतर विवाह समुपदेशक असलेल्या शशांक मराठे यांनी 16 नोव्हेंबर 2023 पूर्वी पोपट पतीकडे सुपूर्त करण्यात यावा, असं नमूद करत संबंधित अहवाल कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांच्याकडे पाठवला. घटस्फोटाच्या अर्जास सहा महिने पूर्ण झाले होते. दोघेही एक वर्षापेक्षा जास्त काळ विभक्त राहत असल्याने न्यायालयानंही त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला.

[ad_2]

Related posts