[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Coronavirus Update in Mumbai : राज्यासह देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus Cases) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने (Corona New Variant) चिंता वाढवली आहे. कोविडच्या (Covid) नव्या JN1 व्हेरीअंटविषयी मुंबई महापालिका (BMC) आरोग्य विभागाकडून (Health Department) माहिती देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सूचना दिल्या आहेत. दक्षा शाह यांनी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटसंदर्भात माहिती देताना सांगितलं की, कोरोनाचा जे एन 1 नावाचा नवा व्हेरीयंट सापडला आहे. मात्र, हा व्हेरीअंट सौम्य स्वरुपाचा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नका. मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णांच्या उपचारा संदर्भात सर्व उपाययोजन आणि तयारी करण्यात आली आहे.
कोरोनाचा JN1 नावाचा नवा व्हेरीयंट
मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितलं की, मुंबई उपाययोजना आणि सुविधांनी सुसज्ज आहे. रुग्णालयातील खाटा, औषधे यांचा आढावा घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार पुढील तयारी सुरु आहे. टेस्टींग करुन नव्या व्हेरीयंटचं संक्रमण तपासण्यात येणार आहे. आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यात येणार आहेत. नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
नागरिकांनी घाबरू नका, काळजी घ्या
राज्यासह देशभरात कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासन सतर्क झालं आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा JN1 व्हेरियंट सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरू नका, मात्र काळजी घ्या, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात 500 हून अधिक कोरोना रुग्ण
देशासह राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या 100 हून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नव्या JN1 व्हेरियंटच्या रुग्णांचाही समावेश आहे. मुंबईतही 19 कोरोना रुग्ण आढळले आहेत, मात्र दिलासादायक बाब म्हणजे यातील एकही रुग्ण नवीन JN1 व्हेरियंटचा नाही. सध्या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना
केरळ, दिल्ली, गोवा, गुजरात आणि कर्नाटकात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्राकडून राज्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे. रुग्णालयाची तयारी, देखरेख आणि मॉक ड्रिलसह तयार राहण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
[ad_2]