[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस मुंबई शहरात ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणात दमटपणा जाणवणार असल्याने मुंबईकरांना आणखी काही दिवस थंडीचा अनुभव घेता येणार नाही. हवामान खात्याच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी 21 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूझ केंद्रात 23.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
सरासरी किमान तापमान 2.5 आणि 3 अंशांनी जास्त आहे. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे किमान तापमानात वाढ तर कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात 33.1 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले गेले. कुलाबा येथील तापमानात 24 तासांत 1.2 अंशांनी वाढ झाली आहे. दोन दिवसांत तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेही वाचा
मुंबईत 250 वायु प्रदूषण सेन्सर बसवण्यात येणार
ख्रिसमसनंतर मुंबईत गारठा जाणवणार
[ad_2]