Salary Of 14 Lakh Employees Is Going To Increase From One Date These People Will Benefit

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Salary Increase :  पंजाबनंतर (Punjab) आता पश्चिम बंगालने (West Bengal)आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ही घोषणा केली आहे. या निर्णयाचा राज्यातील 14 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. डीएमध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. अलीकडेच पंजाब सरकारने आपल्या कर्मचार्‍यांचा डीए वाढवला आहे. 

बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा 

पश्चिम बंगालच्या सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षापासून महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ दिली जाणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी कोलकाता ख्रिसमस कार्निव्हल लॉन्च दरम्यान ही घोषणा केली आहे. डीए वाढवण्याच्या मागणीसाठी पश्चिम बंगालमधील सरकारी कर्मचारी जवळपास वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. घोषणा करताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या की, मी जाहीर करते की 1 जानेवारी 2024 पासून सर्व 14 लाख राज्य सरकारी कर्मचारी, सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व वैधानिक उपक्रम आणि पॅरास्टेटल्स आणि पेन्शनधारकांना 4 टक्के डीए मिळेल.

खर्चात 2400 कोटींची वाढ होणार 

कोलकाता येथील अॅलन पार्क येथे ख्रिसमस उत्सवाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 4 टक्के डीए वाढल्यानंतर सरकारचा खर्च दरवर्षी 2,400 कोटी रुपये होईल. याचा फायदा 14 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. आमच्याकडे निधीची कमतरता आहे पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करून आम्ही डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला थकबाकी भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा एक गट संपूर्ण डीएच्या मागणीसाठी आंदोलनाला बसला होता. या निर्णयाला राज्य सरकारने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

पंजाब सरकारने किती वाढवला महागाई भत्ता?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) चार टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वाढ डिसेंबरपासून लागू होणार आहे. पंजाब स्टेट मिनिस्ट्री अलाईड सर्व्हिसेस युनियन (PSMSU) चे अध्यक्ष अमर सिंग यांनी सांगितले की, वाढीनंतर DA 38 टक्के होईल. पीएसएमएसयूच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत मान यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली.

महत्त्वाच्या बातम्या:

सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट, पगारात झाली ‘एवढी’ वाढ

[ad_2]

Related posts