Maratha Reservation Update It Will Be Difficult For You To Move Around In Maharashtra Manoj Jarang Warns Government

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation : सरकारने आता भानावर यावं, असं म्हणत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारवर (Maharashtra Government) टीकास्त्र डागलं आहे. सरकारने (Maharashtra Government) आता तरी भानावर यावं. पहिल्यांदा एकदा आमचा कार्यक्रम करून बघितला. मात्र, आता नोटीसी देऊन जर काही करण्याचा प्रयत्न केला तर, तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे यांनी परभणीच्या सेलू येथे आयोजित सभेत दिला आहे.

परभणीत जरांगेंची भव्य सभा

मनोज जरांगे यांच्या तीन सभा आज परभणी जिल्ह्यात होत आहेत. त्यातली पहिली सभा सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा देत ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारने तडजोडीसाठी हालचाल करावी, पुढे यावं अन्यथा 24 तारखेनंतर सरकारने सरकारचा रस्ता धरावा, आम्ही आमचे आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं म्हटलं आहे.

मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

आम्ही मुंबईला जाणार नाहीत, तशी घोषणाही दिली नाही मात्र तरीही आमच्या पोरांना नोटीसा दिल्या जात आहेत, जर तुमची इच्छाच असेल तर आम्ही नक्कीच मुंबई बघायला येऊ असंही जरांगे म्हणाले आहेत. आम्ही कायद्याच्या मार्गाने आरक्षण मागत असू अन् तुम्ही नोटिसा देत असाल तर मग आम्ही काय करणार. एखाद्याची गाडी अडवली तर, सगळ्याच गाड्या तिकडे घेऊन जायच्या. मात्र पोलिसांना सहकार्य करा त्यांचा दोष नाही वरच्यांचा आहे, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

‘एकजूट फुटू देऊ नका, राजकारण्यांचे ऐकू नका’

मी मराठ्यांसाठी अन् आरक्षणासाठी मरायला भीत नाही. मी 4 महिने झालं घराचा उंबरा शिवला नाही. माझी मायाबापाशी गद्दारी करणारी औलाद नाही. हा लढा जिंकायचा आहे. माझं कुटुंब हे मराठा समाज आहे, समाजासाठी मरायची ही तयारी ठेवली आहे. एकजूट फुटू देऊ नका राजकारण्यांचे ऐकू नका, असं म्हणत जरांगेंनी मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

‘आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही’

आता पोरांचे वाटोळे नाही होऊ द्यायचं नाही. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावू लढा. मला डॉक्टरने सांगितलं आराम करा, पण आता आरक्षण मिळण्याची वेळ आलीय. माझं शरीर आता मला साथ देत नाहीये, पण मी थांबणार नाही. मी एक इंच ही मागे हटणार नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts