Christmas WhatsApp Sticker How To Download Send Whatsapp Christmas Stickers Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Christmas WhatsApp Sticker : डिसेंबर महिना म्हटलं की नवीन वर्षाची चाहूल आणि नाताळचा सण हे मुख्य आकर्षण असतं. त्यातच नाताळचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सण म्हटलं की मित्र-मैत्रीणींना, नातेवाईकांना शुभेच्छा देणं साहजिक आहे. या निमित्ताने सर्व एकमेकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात. मात्र, सध्याचं युग हे डिजीटल असल्या कारणाने सण देखील ऑनलाईन पद्धतीने साजरी केले जातायत. आजकाल लोक अधिकतर ऑनलाईन पद्धतीनेच एकमेकांना शुभेच्छा देतात. या शुभेच्छा फोटो, व्हिडीओ आणि GIF च्या माध्यमातून दिल्या जातात. आज आम्ही तुम्हाला सुद्धा तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला यंदा शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्या कशा द्यायच्या या संदर्भात अधिक माहिती देणार आहोत. यासाठी तुम्ही व्हॉट्सअप स्टिकरचा उपयोग करू शकता. ही पद्धत डिफॉल्ट पद्धतीने व्हॉट्सअप मध्ये येते. पण, खूप कमी लोक याचा वापर करतात. याचे कारण म्हणजे लिमिटेड स्टॉक नसणे. 

आज आम्ही तुम्हला स्टिकरच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याची पद्धत सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना व्हॉट्सअप स्टिकरच्या माध्यमातून ख्रिसमस आणि न्यू इअरच्या शुभेच्छा नवीन पद्धतीने देऊ शकतात. व्हॉट्सअपमध्ये कंपनीने डिफॉल्ट रूपात काही स्टिकर ऍड केले आहेत. 

‘असे’ डाउनलोड करा ख्रिसमस आणि न्यू इअरचे स्टिकर : 

व्हॉट्सअप वर सांता आणि मेरी ख्रिसमसचे स्टिकर पाठवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरून हे स्टिकर तुम्हाला डाउनलोड करावे लागतील. तुम्हला गुगल प्ले स्टोअर वर जाणून ख्रिसमस आणि न्यू इअरच स्टिकर सर्च करा. तिथे तुम्हला खूप सारे ऑप्शन दिसतील. त्यातून तुम्ही कोणतेही स्टिकर निवडू शकतात. डाउनलोड केल्यानंतर या स्टिकर पॅकला उघडून ऍड टू व्हॉट्सअप करावे. तसेच व्हॉट्सअप मध्ये जाऊन पण तुम्ही हे काम करू शकता. व्हॉट्सअपला स्टिकर जोडण्यासाठी तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसेल. येथून तुम्ही कोणत्याही विषयाचे नवीन स्टिकर जोडू शकतात. एकदा स्टिकर ऍड झाल्यानंतर तुम्ही ते कोणत्याही चॅटवर पाठवू शकता.

महत्त्वाच्या बातम्या :

Poco M6 5G Launch :    नवीन 5G फोन घेण्याचा प्लॅन आहे, POCO चा स्वस्त्यात मस्त नवा कोरा फोन लाँच; कोणते फिचर्स मिळणार?

[ad_2]

Related posts