Ajit Pawar On Manoj Jarange Maratha Reservation Ram Mandir Amit Shah Meeting MP Suspended Bhide Wada Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, अशी स्पष्टोक्ती मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange)  बीडमधील इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री  अजित पवारांनी (Ajit Pawar)  दिली आहे.  अजित पवार यांनी आज भल्या पहाटे भिडे वाड्याची पाहणी केली. भिडेवाड्याचं लवकरच स्मारक करणार असल्याची अजित पवारांनी साांगितलं. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर अजित पवारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती देखील केली. 

मनोज जरांगेच्या इशारा सभोवर बोलताना अजित पवार म्हणाले,  कोणी काही मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,सरकारला नियमात आणि कायद्याच्या चौकटीत बसेल त्याच गोष्टी कराव्या लागतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिलेले  आरक्षण टिकले नाही,फडणवीस यांनी अभ्यास करून दिलेले आरक्षण टिकला पण पुढे ते हाय कोर्टत टिकल नाही. आता तिसऱ्यांदा आरक्षण देताना टिकाणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहेय 

अजित पवारांनी घेतली पालिका आयुक्तांची शाळा

महात्मा फुले वाड्यात असणाऱ्या चेंबरमुळे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. चेंबर काढण्याच्या आयुक्तांना  सूचना दिल्या.  त्याजागी सलग फरशी बसवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले. शिवाय महात्मा फुले वाड्यात असणाऱ्या बोर्डाकडे बघून लोकं बोर्ड नाही वाडा बघायला येतात, असे अजित पवार या वेळी म्हणाले. 

अमित शाह यांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

राज्यात निर्माण झालेला कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न तसेच दूध दराचा प्रश्न याबाबत अजित पवार  गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या विषयी बोलताना अजित पवार म्हणाले, अमित शाह यांचे राज्यसभा आणि लोकसभेत काम सुरू आहे. त्यामुळे ते आता भेटणार नाहीत. ते झालं की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याना बोलावतो म्हटले आहे. पण त्यांनी अचानक निरोप दिला तर आम्ही आमचे दौरे रद्द करून अमित शाह यांना भेटण्यासाठी जाणार आहे.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बोलावले तर जाणार : अजित पवार

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याविषयी देखील अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, अद्याप मला राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रण आलेलं नाही. उद्घाटनला बोलावले तर जाण्याचा जरूर विचार करेल. सर्व धर्म समभाव मानणारे आहोत,मी पण सकाळी दगडूशेठ आरती केली.

संसद खासदार निलंबनावर अजित पवार म्हणाले….

संसदेतील खासदार निलंबनावर अजित पवार म्हणाले,  अनेक खासदार काम करत असताना नियम भंग झाला की कारवाई केली जाते. मला माहिती नाही तिथे काय घडले,विधानसभेत काय घडलं सागितले असते. उपराष्ट्रपती,मुख्यमंत्री त्यांनी जनाधार मिळवलेला असतो,जिथं काय घटना घडली ती कारवाई केली आहे.

सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले दोन्ही स्मारक करण्याचा प्रयत्न : अजित पवार

सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले दोन्ही स्मारक करण्याचा प्रयत्न आहे. जागतिक दर्जाचे स्मारक करण्यासाठी जागा हस्तांतरण काम करावं लागणार आहे. अनेक भाडेकरू आणि मालक या भागात राहत आहेत.स्मारकाला कोणाचा विरोध  नाही. हार्ट ऑफ सिटीत स्मारक होणार आहे.  कोणालाही त्रास होणार नाही  असा सरकारचा प्रयत्न असणार आहे, असेही अजित पवार म्हणाले. 

हे ही वाचा :

Ajit Pawar : पवार कुटुंबात मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, भूमिका बदलणार नाही : अजित पवार 

 

[ad_2]

Related posts