Maharashtra Weather Update Cold Wave In Maharashtra Temperature Drops In State Temperature Is Likely To Increase In Next Few Days During Christmas

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Weather Update Today : राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला आहे. एकीकडे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळत असून उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील (Maharashtra Weather Forecast) तापमानातही कमालीची घट झाली आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढल्याने लोक शेकोटीचा आधार घेत आहे. पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 25 डिसेंबर दरम्यान तापमानात किंचित वाढ होईल त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. 

उबदार कपडे अन् शेकोटीचा आधार

राज्यात आठवडाभर कोरडं वातावरण राहणार असून हवेत कमालीचा गारवा जाणवेल. जळगाव जिल्ह्यात सध्या थंडीची लाट सुरू आहे. जळगावमध्ये तापमान 10 अंशापर्यंत खाली घसरलं आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासूनच गुळाचा चहा, मिरची भजे आणि झणझणीत मिसळ खाण्यासाठी जळगावकरांनी गर्दी केल्याचं चित्र जळगावमध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. 

येवल्यात पसरली दाट धुक्याची चादर

पंढरपुरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री कडाक्याची थंडी पडू लागल्याने नागरिक मोठ्या संख्येने आजारी पडू लागले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर आता नाशिकच्या येवला शहरासह परिसरात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरली आहे. दाट धुक्यामुळे परिसरातील शेत तसेच रस्ते देखील दिसून येत नसल्याचे चित्र होते. ‘मॉर्निंग वॉक’ ला जाणाऱ्या येवलेकरांनी या गुलाबी थंडीसह दाट धूक्याच्या चादरीचा मनमुराद आनंद घेतला. दरम्यान, या धुक्याचा परिणाम शेतीपिकांवर होणार असून गारपिटीमूळे वाचलेल्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे.

अवकाळी पावसानंतर वातावरणात कमालीचा गारवा 

हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण प्रचंड थंडी त्याचबरोबर धुक्याची दाट पसरलेली चादर यामुळे वातावरणात पूर्णपणे बदल झाल्याचे पाहायला मिळते. धुके इतके दाट प्रमाणात होते की, अगदी 200 मीटर पर्यंतही दिसत नव्हतं. दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, त्यामुळे याचा फटका सकाळी हिंगोली शहरात येणारे दूधवाले, शाळकरी मुले, यासह भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणारे शेतकरी यांना बसतोय.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts