Wtc Final 2023 Ind Vs Aus Playing Xi Kennington Oval Pitch Report Live Streaming And Match Prediction World Test Championship

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WTC Final 2023, IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) च्या अंतिम फेरीत टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सामना होणार आहे. दोघांमधील हा सामना 7 जून, बुधवारपासून लंडनमधील ओव्हल ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामना सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघ कोणत्या प्लेईंग इलेव्हनसह मैदानात उतरतील आणि ओव्हल ग्राउंडची खेळपट्टी कशी असेल? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. चला जाणून घेऊया सामन्याशी संबंधित महत्त्वाचे तपशील… 

पिच रिपोर्ट 

कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. येथे विकेटवर चांगला बाउन्स दिसतो. वेगवान गोलंदाजांसाठी ओव्हलची खेळपट्टी फायदेशीर ठरेल, पण जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी प्रभावी ठरू लागते. तिसऱ्या दिवसाच्या आसपास फिरकीपटूंचं वर्चस्व सुरू होतं. या खेळपट्टीवरील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर असेल तरीदेखील वेगवान गोलंदाजांचा स्विंग हवामानावर अवलंबून असतो. नुकत्याच समोर आलेल्या खेळपट्टीच्या एका फोटोमध्ये विकेटच्या आसपास हिरवळ दिसत होती. अशा प्रकारचा विकेट पेसर आणि सीमर्सना चांगली मदत करू शकते.

मॅच प्रिडिक्शन 

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्याबाबत बोलायचं झालं तर, या मैदानावर ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक सामने खेळले आहेत. तर टीम इंडियानं कांगारुंच्या तुलनेत कमी सामने खेळले आहेत. दरम्यान, दोन्ही संघांचा रेकॉर्ड फारसा खास नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं लंडनच्या ओव्हल ग्राउंडवर 38 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. 

तर टीम इंडियानं 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. अशातच दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियानं 44 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियानं केवळ 32 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाचं पारडं काहीसं जड आहे. ओव्हल ग्राउंडवर टीम इंडियानं आपला शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला होता. त्या सामन्यात टीम इंडियानं विजयाला गवसणी घातली होती. तर, ऑस्ट्रेलियाला 2019 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 

लाईव्ह स्ट्रिमिंग

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. दूरदर्शनवर या सामन्याचे मोफत थेट प्रक्षेपण करणार आहे. याशिवाय, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या माध्यमातून सामना थेट प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हा सामना मोबाईलवरही थेट पाहू शकणार आहात.

टीम इंडिया आणि टीम ऑस्ट्रेलिया यांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : 

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट

टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिंस (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स केरी (विकेटकिपर), कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंगलिस (विकेटकिपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, टॉड मर्फी, स्टीव स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, डेविड वार्नर

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

WTC Final Ind vs Aus: ‘सॉफ्ट सिग्नल’ हद्दपार, हेल्मेटही… WTC फायनलमध्ये नव्या नियमांची नांदी



[ad_2]

Related posts