Amazon Reduces Prime Lite Membership Plan By Rs 200 Check New Price And Benefits Changed

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amazon Prime Lite membership :  ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने भारतात आपल्या ॲमेझॉन प्राइम लाइट सब्सक्रिप्शनची फी कमी केली आहे. कंपनीने वार्षिक फी 200 रुपयांनी कमी केली आहे. आतापर्यंत कंपनी वार्षिक सब्सक्रिप्शनसाठी 999 रुपये लागत होती पण, आता ग्राहकांना हा प्लॅन फक्त 799 रुपयांत मिळणार आहे. कंपनीने किंमती कमी केल्याच पण ॲमेझॉनने या प्लॅनअंतर्गत मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये बदल केला आहे.

बेनिफिट्समध्ये कोणते बदल केले?

ॲमेझॉन प्राईम लाइट सब्सक्रिप्शन अंतर्गत कंपनी आता वन डे डिलिव्हरी, टू डे, शेड्यूल डिलिव्हरी आणि सेम डे डिलिव्हरीचा पर्याय देत आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय, 6 महिन्यांसाठी फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट, ॲमेझॉन डील्स आणि व्हिडीओंचा लवकर ॲक्सेस देखील कंपनीकडून दिला जाणार आहे. याशिवाय नवीन प्लॅनअंतर्गत कंपनी 175 रुपयांपेक्षा जास्त ऑर्डरवर मॉर्निंग डिलिव्हरी, रश-शिपिंग आणि 25 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील देणार आहे. कंपनीने आणखी एक बदल केला आहे म्हणजे आधी ॲमेझॉन प्राइम लाइट सब्सक्रिप्शन 2 डिव्हाइस चालवत होते, पण आता या प्लॅनमध्ये फक्त एकच डिव्हाइस चालेल.

व्हिडिओची क्वॉलिटी HD असणार

या प्लॅनअंतर्गत व्हिडीओ क्वालिटी केवळ एचडीपुरती मर्यादित असून स्टँडर्ड प्लॅनसोबत येणाऱ्या ॲमेझॉन प्राईम म्युझिक आणि रीडिंगची सुविधा तुम्हाला मिळणार नाही. भारतात कंपनी एकूण 4 प्लॅन ऑफर करते, ज्यात 299 रुपयांचा मंथली प्लॅन, 599 रुपयांचा तिमाही प्लॅन, 1,499 रुपयांचा स्टँडर्ड एन्युअल प्लॅन आणि 999 रुपयांचा ॲमेझॉन लाइट सब्सक्रिप्शन प्लॅनचा समावेश आहे, जो आता 799 रुपये झाला आहे.

लाइट आणि स्टँडर्ड प्लॅन मधील फरक 

ॲमेझॉनच्या लाइट आणि स्टँडर्ड प्लॅनमधील फरक असा आहे की, स्टँडर्ड प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड ॲमेझॉन प्राईम जाहिराती मोफत व्हिडीओ, म्युझिक, रीडिंग सपोर्ट मिळतो. याशिवाय कंपनी 50 रुपयांपर्यंतच्या वस्तूंची मॉर्निंग डिलिव्हरीही करते. स्टँडर्ड प्लॅनसोबत प्राइम गेमिंग आणि फॅमिली ऑफर्स देखील मिळतात.

या ऑफरमुळे तुमचे पैसे वाचणार आहे. शिवाय तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे व्हिडीओदेखील बघायला मिळणार आहे. त्यामुळे अनेकजण या ऑफर्सची वाट बघत होते. त्यामुळे ॲमेझॉनकडून सर्व ग्राहकांसाठी या ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या :

Telecom Bill 2023 : आता बनावट सिमची विक्री आणि खरेदी केल्यास लाखोंचा दंड, जाणून घ्या सिम खरेदीचे नवे नियम!

[ad_2]

Related posts