[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क 2023′च्या (एनआयआरएफ) क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान घसरले आहे. देशभरातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांचं रँकिंग काल जारी करण्यात आलं आहे.सर्व शैक्षणिक संस्थाच्या क्रमवारीत 35 व्या स्थानावर तर विद्यापीठांच्या गटात 19 व्या क्रमांकावर गेले आहे. मागील वर्षी पुणे विद्यापीठ सर्वच संस्थांच्या गटात 25 व्या स्थानावर होते. विद्येचं माहेरघर म्हणल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रँकिगमध्ये दोन वर्षापासून सातत्याने होणारी घसरण ही चिंता वाढवणारी आहे.
केंद्र सरकारच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’तर्फे दरवर्षी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाते. पुणे विद्यापीठ हे कायम वरच्या स्थानावर असे. विद्यापीठाचे रँकिंग जरी घसरले अकले राज्यातून देशपातळीवर आघाडीवर असणारे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ आघाडीवर आहे.
टॉप विद्यापीठांच्या यादीत टॉप 10 मध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठांचा समावेश नाही. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ हे या यादीत 19व्या क्रमांकावर आहे. तर मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) 23व्या क्रमांकावर आहे. तसेच, पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल हे या यादीत 32व्या क्रमांकावर आहे. पुणे विद्यापीठाला एकूण सरासरी 58.31 गुण मिळाले आहे. तर ओव्हरऑल गटात 55.78 गुण मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील विद्यापीठांची क्रमवारी
विद्यापीठ | स्कोअर | क्रमांक |
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे | 58.19 | 19 |
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी | 57.07 | 23 |
सिम्बायोसिस इंटरनॅशनल (पुणे, महाराष्ट्र) | 53.13 | 32 |
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अॅन्ड रिसर्च | 51.92 | 39 |
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे | 50.62 | 46 |
नरसी मोनजी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, मुंबई | 50.31 | 47 |
मुंबई विद्यापीठ, मुंबई | 48.63 | 56 |
भारती विद्यापीठ, पुणे | 43.61 | 91 |
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई | 43.08 | 98 |
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू या शैक्षणिक संस्था देशातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. रँकिंग फ्रेमवर्क शिक्षण, शिक्षण आणि संसाधने (TLR), संशोधन आणि व्यावसायिक सराव (RP), ग्रॅज्युएशन आउटकम (GO), आउटरीच आणि समावेश (OI) आणि परसेप्शन (PR) च्या पॅरामीटर्सच्या पाच व्यापक सामान्य गटांच्या अंतर्गत संस्थांना न्याय देते. पॅरामीटर्सच्या या पाच विस्तृत गटांपैकी प्रत्येकासाठी दिलेल्या संख्यांच्या बेरजेवर आधारित रँक दिल्या जातात. महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ आणि महाविद्यालयाला सर्वोत्तम टॉप 10 विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवता आलेलं नाही.
हे ही वाचा :
NIRF रँकिंगमध्ये मुंबई IIT सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत चौथं; तर दंत महाविद्यालयांमध्ये पुण्याचं डी. वाय. पाटील विद्यापीठ तिसरे
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
[ad_2]