Ajit Pawar Comment On Sharad Pawar For Maharashtra Politicis In Baramati Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar : मी 60 वर्षाचा झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी  वसंत दादांना मागे सारले असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला. तुम्ही 40 च्या आत निर्णय घेतला, मी तर 60 च्या नंतर निर्णय घेतला. त्यामुळं तुम्ही मला समजून घेतले पाहिजे असे अजित पवार म्हणाले. 

मी मागेही सांगितले आहे की काळ बदलत असतो. एक वर्ष चर्चा सुरु होती. मी घेतलेला निर्णय योग्य होता म्हणून इतकी लोकं माझ्यामागे आली असल्याचे अजित पवार म्हणाले. मी त्यांना काय दमदाटी केली का? भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आपल्यासोबत आल्याचे अजित पवार म्हणाले. सत्तेचा फायदा आपल्याला होतोय. आजूबाजूच्या तालुक्याची आणि आपली परिस्थिती बघा असे अजित पवार म्हणाले. 

[ad_2]

Related posts