Prasidh Krishna Gets Engaged To Rachana, Players Showers Love See Pics Of Beautiful Couple

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Prasidh Krishna Engaged :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलिया आणि भारताची तयारी जोरात सुरू आहे. या विजेतेपदासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही विजेतेपदाची लढत ७ जूनपासून सुरू होणार आहे. अशातच भारताच्या वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याचा साखरपुडा पार पडला आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. प्रसिद्ध कृष्णा याने आयुष्याच्या खेळपट्टीवर नवीन इनिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्याचा साखरपुडा पार पडलाय. लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ऋतुराज गायकवाड, लोकेश राहुल यांच्यापाठोपाठ आणखी एक भारतीय खेळाडू विवाहबंधनात अडकणार आहे.


सोशल मीडियावर प्रसिद्ध कृष्णा याच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये प्रसिद्ध कृष्णा आपल्या होणाऱ्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवून बसल्याचे दिसतेय. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नवीन जोडपे एकमेकांना पाठ लावून बसले आहेत आणि दोघेही हळदीने रंगले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये कृष्णाने कुर्ती घातली आहे, तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने सुंदर ड्रेस घातलेला आहे.


आयपीएलमध्ये प्रसिद्ध कृष्णा राजस्थान रॉयल्सच्या संघाचा सदस्य आहे. पण यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे तो आयपीएलला मुकला होता.   आयपीएल 15 चा हंगाम प्रसिद्धसाठी दमदार राहिला होता. प्रसिद्धने भेदक मारा केला होता. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या प्रसिद्ध कृष्णा याने 2021 मध्ये टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. प्रसिद्ध कृष्णा याने 14 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलेय. इंग्लंडविरोधात पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात 25 बळी घेतले आहेत. कसोटी आणि टी 20 क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कृष्णा याला अद्याप संधी मिळालेली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कृष्णा याने चांगली कामगिरी केली आहे.

 



[ad_2]

Related posts